PM Modi on TMC : तृणमूल काँग्रेसने जिहाद्यांना मतदानाचा हक्क दिला; मोदींच्या भाषणातील ५ महत्त्वपूर्ण मुद्दे

PM Modi on TMC : तृणमूल काँग्रेस सत्य सहन करू शकत नाही. जो कोणी टीएमसीचे गुन्हे उघडकीस आणतो, टीएमसी त्यांना लक्ष्य करते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

128
देश चालवण्यासाठी सर्वांची संमती आवश्यक, लोकसभा अधिवेशनाच्या भाषणाची सुरुवात करताना Narendra Modi म्हणाले...
देश चालवण्यासाठी सर्वांची संमती आवश्यक, लोकसभा अधिवेशनाच्या भाषणाची सुरुवात करताना Narendra Modi म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (२८ मे) पश्चिम बंगालमधील (West Bengal) बारासात येथे झालेल्या निवडणूक रॅलीत तृणमूल काँग्रेसवर (Trinamool Congress) जोरदार हल्लाबोल केला. (PM Modi on TMC) तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे टीएमसीने सीएएविरोधात खोटे पसरवले आहे. मात्र आज शेकडो निर्वासितांना नागरिकत्व मिळाल्याचे संपूर्ण देश पाहत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या रॅलीला संबोधित करतांना पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेले महत्त्वपूर्ण मुद्दे –

(हेही वाचा – Palghar Railway station मध्ये मालगाडी रुळावरुन घसरली, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत)

  1. तृणमूल काँग्रेस सत्य सहन करू शकत नाही. जो कोणी टीएमसीचे गुन्हे उघडकीस आणतो, टीएमसी त्यांना लक्ष्य करते. भागीरथीमध्ये हिंदू वाहून जातील, असे TMC आमदाराने स्पष्टपणे सांगितले असल्याचेही तुम्ही पाहिले आहे. यावर बंगालच्या संतांनी टीएमसीला चूक सुधारण्यास सांगितले, मात्र त्यांनी संत समाजालाच शिव्या देण्यास सुरुवात केली.

2. कोलकाता उच्च न्यायालयाने ७७ मुस्लिम जातींना ओबीसी म्हणून बेकायदेशीर आणि घटनाबाह्य घोषित केले. या निर्णयानंतर टीएमसीच्या मुख्यमंत्र्यांनी न्यायाधिशांच्या हेतूवर आणि आपल्या न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. मला टीएमसीच्या लोकांना विचारायचे आहे, तुम्ही तुमच्या गुंडांनाही न्यायाधीशांच्या मागे सोडणार का ?

3. टीएमसी आणि भारत युतीला तुमच्या विकासाची चिंता नाही. त्यांची व्होट बँक खूश करणे हे त्यांचे सर्वात मोठे प्राधान्य आहे. देशात रात्रंदिवस ‘संविधान-संविधान’ आणि ‘हुकूमशाही-हुकूमशाही’ असा जयघोष करणाऱ्या या मंडळींनी पश्चिम बंगालमध्ये काय चालले आहे, ते पाहिले तर त्यांची बोलती बंद होईल.

4. स्वातंत्र्यापूर्वी एक काळ असा होता, जेव्हा बंगाल लाखो देशवासियांना रोजगार देत असे. आज बंगालमधील बहुतेक कारखाने बंद आहेत, तरुणांना येथून स्थलांतर करावे लागले आहे. आधी बंगाल काँग्रेसने लुटला, नंतर डाव्यांनी लुटला आणि आता टीएमसी दोन्ही हातांनी लुटत आहे.

5. टीएमसीने पश्चिम बंगालचा विश्वासघात केला आहे. लाखो ओबीसी तरुणांचे मतदानाचे हक्क त्यांनी रातोरात जिहादींना देऊन टाकले. (PM Modi on TMC)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.