पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी आले, त्यामुळे पनवती लागली आणि भारत हरला, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली होती. त्यानुसार आता विरोधकांमधील नेतेमंडळी हा शब्दप्रयोग करून पंतप्रधानांना लक्ष्य करू लागले आहे. अशीच टीका तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनू सेन यांनी करताना त्यांची भाषा घसरली. त्यामुळे भाजपने आता त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत त्यांच्याकडे खासदारकीच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
काय म्हणाले खासदार शांतनू सेन?
जेव्हा मोदी देशात होते, तेव्हा इस्रोचे मिशन फेल झाले. जेव्हा कंगना मोदींना (PM Narendra Modi) भेटली, तेव्हा तिचा सिनेमा सुपर फ्लॉप झाला. जेव्हा विराट कोहलीने मोदींशी हात मिळविला तेव्हा सलग तीन वर्षे त्याला शतकच ठोकता आले नाही. वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ सलग १० सामने जिंकत होता, परंतू मोदी त्या स्टेडिअममध्ये गेले आणि फायनल हरला, मला भीती वाटतेय की मोदी तेजस विमानात बसले, आता ते लवकरच अपघातग्रस्त होणार तर नाही ना, असे खासदार सेन म्हणाले.
(हेही वाचा Shani Shingnapur : शनिशिंगणापूर देवस्थानाला भ्रष्टाचाराचा विळखा; अतिरिक्त कर्मचारी नियुक्ती; निविदेशिवाय खरेदी )
भाजपची काय आहे मागणी?
हे लोक केवळ पंतप्रधान मोदींचा (PM Narendra Modi) द्वेष करत नाहीत तर त्यांना देशाचे कल्याणही नको आहे. प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण आहे की पंतप्रधान तेजसमध्ये उड्डाण करत होते, जे स्वदेशी उत्पादन आणि देशाच्या अभिमानाचे प्रतीक आहे, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community