‘अमरावती बंद’ला हिंसक वळण!

त्रिपुरा येथील कथित हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी धर्मांध मुसलमानांनी शुक्रवारी राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढले, त्यावेळी हिंसाचार घडवला. मालेगाव, अमरावती येथे हा हिंसाचार वाढला होता. त्याचा निषेध म्हणून शनिवारी ‘अमरावती बंद’चे आवाहन करण्यात आले. त्यानुसार सकाळपासून अमरावतीमध्ये मोठ्या संख्येने जमाव जमला होता. जमावाकडून या ठिकाणी तणाव निर्माण करण्यात आला. या बंदला काही प्रमाणात हिंसक वळण आले.

पोलिसांचा लाठीमार

आंदोलकांकडून काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. राजकमल चौकात दगडफेक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला. या भागात जमावाने घोषणाबाजी केली. याप्रकरणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई माध्यमांशी बोलताना म्हणाले की, शुक्रवारी विना परवानगी अमरावतीत मोर्चा काढण्यात आला होता, हिंसा घडवून आणली होती. शनिवारी अमरावती बंद ला हिंसक वळण लागले. आम्ही संबंधितांवर कारवाई करणार आहे.

(हेही वाचा : राज्यातील हिंसाचाराला रझा अकादमी कारणीभूत! नितेश राणेंचा आरोप)

शुक्रवारच्या हिंसचाराच्या निषेधार्थ बंद

त्रिपुरात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता, मात्र या मोर्चाला गालबोट लागले होते. या मोर्चाला हिंसक वळण आले, तर गाड्या व 20 ते 25 दुकानाची तोडफोड करण्यात आली होती. याचाच निषेध म्हणून ‘अमरावती शहर बंद’चे आवाहन वतीने करण्यात आले होते. याच बंद दरम्यान हिंसाचार झाल्याचे पहायला मिळत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here