Tuhin Kant Pandey: भारताच्या अर्थ सचिव पदी ‘या’ वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती 

156
Tuhin Kant Pandey: भारताच्या अर्थ सचिव पदी ‘या’ वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती 
Tuhin Kant Pandey: भारताच्या अर्थ सचिव पदी ‘या’ वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती 

केंद्र सरकारने ज्येष्ठ नोकरशहा तुहीन कांत पांडे यांची नवे अर्थ सचिव (Appointed Finance Secretary) म्हणून नियुक्ती शनिवारी करण्यात आली. पीटीआय या वृत्तसंस्थेने अधिकृत आदेशाच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. (Tuhin Kant Pandey)

पांडे हे 1987 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत

तुहिन कांत पांडे (Tuhin Kant Pandey) हे सध्या डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट आणि पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट म्हणजेच DIPAM चे सचिव म्हणून काम करत आहेत. ते ओडिशा केडरचे 1987 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सरकारच्या वरिष्ठ नोकरशहांमध्ये त्यांची गणना होते. (Tuhin Kant Pandey)

कार्मिक मंत्रालयाने आदेशात नियुक्तीची माहिती दिली

कार्मिक मंत्रालयाने (Ministry of Personnel) एका आदेशात तुहीन कांत पांडे यांच्या नियुक्तीची माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांची वित्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

टीव्ही सोमनाथन यांच्या जाण्याने हे पद रिक्त झाले आहे.

अर्थ मंत्रालयात अर्थ सचिव हे पद अत्यंत शक्तिशाली मानले जाते. अर्थ मंत्रालयातील हे सर्वात वरिष्ठ सचिव पद आहे. अर्थ, तुहिन कांत पांडे आता अर्थ मंत्रालयातील सर्वात शक्तिशाली नोकरशहा बनतील. त्यांच्या आधी टीव्ही सोमनाथन हे या पदावर होते. टीव्ही सोमनाथन यांना गेल्या महिन्यात कॅबिनेट सेक्रेटरी बनवण्यात आले होते, ज्यामुळे अर्थ सचिव पद रिक्त होते.

(हेही वाचा – Anant Ambani लालबागच्या राजाला दरवर्षी किती कोटींची देणगी देतात?)

टीव्ही सोमनाथन यांनी 3 वर्षे या पदावर काम केले

कार्मिक मंत्रालयाने गेल्या महिन्यात माहिती दिली होती, की केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने टीव्ही सोमनाथन यांची कॅबिनेट सचिव म्हणून दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. टीव्ही सोमनाथन (TV Somanathan) हे तमिळनाडू केडरचे 1987 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 2021 पासून ते वित्त मंत्रालयात अर्थ सचिव पदावर होते. त्याआधी 2019 पासून त्यांच्याकडे वित्त मंत्रालयात खर्च सचिवपदाचा कार्यभार होता. टीव्ही सोमनाथन यांनी 2015 ते 2017 या काळात पंतप्रधान कार्यालयातही काम केले आहे. (Tuhin Kant Pandey)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.