डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना अवघ्या तीन महिन्यांत कार्यमुक्त होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या त्यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेची जबाबदारी होती. पुढील नियुक्तीपर्यंत प्रतीक्षा करण्याची सूचना त्यांना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे १६ वर्षांच्या कारकीर्दीतील त्यांची ही १९वी बदली आहे.
( हेही वाचा : वीर सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींची गळाभेट घेतली, हिंदुत्व शब्दही उच्चारू नका!)
सामान्य प्रशासन विभागाने त्यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. मुंढे यांच्याकडील कुटुंबकल्याण आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक पदाचा कार्यभार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडे देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या प्रकल्प संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून कार्यमुक्त व्हावे व पुढील आदेशाची प्रतिक्षा करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
कारण काय?
तुकाराम मुंढे यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर त्यांनी राज्यभरात दौरे केले. याकाळात जे अधिकारी आणि कर्मचारी बेजबाबदारपणे वागतील, त्यांना खास शैलीत इशारा दिला होता. मुंढे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. त्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी या संदर्भात तुकाराम मुंढे यांना सूचना देखील केल्याची माहिती समोर आली होती. त्यास आठवडा पूर्ण होण्याआधीच तुकाराम मुंढे यांना कार्यमुक्त होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या अधिकाऱ्यांच्या बदल्या.
- भाग्यश्री बानाईत (मुख्य कार्यकारी अधिकारी, शिर्डी संस्थान) – सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूर
- व्ही एन सूर्यवंशी (अतिरिक्त आयुक्त, एम.एम.आर.डी.ए) – आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क
- सौम्या शर्मा (सहाय्यक जिल्हाधिकारी नांदेड) – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर
- एस.एम. कुर्ती कोटी – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा
- एस.एस. चव्हाण – आयुक्त कृषी
- तुकाराम मुंढे – नियुक्ती प्रतीक्षाधीन