ट्विटर आणि हिंदुद्वेष जणू काही समीकरण बनले आहे. जगाच्या पाठीवर कुठेही हिंदूंवर अत्याचार होत असेल आणि त्यावर जागरूक हिंदू ट्विटरवर जनजागृती करू लागले की लगेचच ट्विटरला पोटशूळ उठतो. संबंधीत व्यक्ती किंवा संस्थेचे ट्विटर अकाउंट त्यांना काहीही न कळवता बंद केले जाते. असे प्रकार वारंवार घडत आहेत. बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनेवरून पुन्हा एकदा हे अधोरेखित झाले आहे.
‘या’ संस्थांचे ट्विटर अकाऊंट केले बंद!
बांगलादेशात तेथील अल्पसंख्यांक हिंदूंवर होत असलेले अत्याचार तेथील प्रसारमाध्यमे लपवत आहेत. त्यामुळे या अत्याचाराला सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचा प्रयत्न हिंदूंनी सुरु केला आहे. त्यासाठी बांगलादेशातील ‘इस्कॉन’ आणि ‘बांगलादेश हिंदू युनिटी कौन्सिल’ यांच्या ट्विटर हँडलने पुढाकार घेतला. या संस्थांचे ट्विटर अकाउंट ट्विटरने तडकाफडकी बंद करून पुन्हा एकदा आपला हिंदूद्वेष उघड केला आहे. कारण या माध्यमातून बांगलादेशात सुरु असलेल्या हिंदू विरोधी अत्याचाराची माहिती जगाला मिळत होती, त्यामुळे जगभरातील हिंदूंकडून बांगलादेशातील सरकारवर कारवाईसाठी दबाव वाढू लागला होता. विशेष म्हणजे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आलेल्या संस्थांपैकी इस्कॉन संस्था ही स्वतः या हल्ल्यांमध्ये पीडित आहे. बांगलादेशातील इस्कॉनच्या मंदिरावर धर्मांध मुसलमानांनी हल्ला करून २ कृष्ण भक्तांची हत्या केली आहे.
(हेही वाचा : कंगना एकटीच नाही! ट्विटरची कारवाई हेतुपुरस्सर?)
२३ ऑक्टोबरला इस्कॉनचे जागतिक आंदोलन!
जगभरात पसरलेल्या इस्कॉनने बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात २३ ऑक्टोबर रोजी जगभरात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जगभरातील हिंदूंनी ते ज्या ज्या देशात आहेत, तिथे जिथे कुठे इस्कॉनचे आंदोलन होणार आहे, त्याची माहिती घेऊन त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
https://twitter.com/RashmiDVS/status/1450496385183141894?s=20
सोशल मीडियावर मोहीम सुरु!
बांगलादेश सरकारच्या विनंतीवरून हे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आल्याचे समोर आले आहे. यावर या ट्विटर अकाउंटवरून हिंदूंवरील अत्याचाराचे व्हिडिओ प्रसारित झाल्याने शेख हसीना सरकार घाबरले, हे स्पष्ट होते, असे नेटकरी म्हणत आहेत.
Twitter deletes handles of "IskconBangladesh", "BangladeshHinduUnityCouncil" at the request of Mu$l!m supportive Bangladesh Govt. Now it is clear that Bangladeshi Mu$l!m supportive Sheikh Haseena is getting spooked at the videos & information put out by these 2 handles pic.twitter.com/apaoH2HOXB
— Defence360 (@Defence__360_) October 19, 2021
यापूर्वी ‘या’ हिंदुत्वनिष्ठांचे ट्विटर अकाउंट केले बंद!
- कंगना राणावत – पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालानंतर त्या ठिकाणी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी दंगली केल्या, हिंदूंवर हल्ले केले. त्याचा सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत हिने विरोध केल्यामुळे तिचे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आले.
- पायल रोहतगी – कंगनाप्रमाणे बेधडकपणे मतप्रदर्शित करणारी हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री पायल रोहतगी हिचेही ट्विटर अकाउंट ट्विटरने बंद केले.
- जागृती शुक्ला – टीव्ही अँकर आणि ज्येष्ठ पत्रकार जागृती शुक्ला हीदेखील राष्ट्रविरोधी कृत्यांचा कडक भाषेत समाचार घेत होती, तिचेही ट्विटरने नोव्हेंबर २०१८मध्ये अकाउंट बंद केले.
- फ्रांसुआ गोतिए – मूळचे फ्रांस नागरिक असलेले आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, भारतीय इतिहास अभ्यासक फ्रांसुआ गोतिए यांनीब्रिटिशांच्या वसाहतवाद या अमानवीय यंत्रणेवर आसूड उगारणारे पुस्तक ‘एॅन एन्टायरली न्यू हिस्ट्री ऑफ इंडिया’ (भारताचा एकदम नव्या पद्धतीने लिहिलेला इतिहास) हे पुस्तक लिहिले. त्यासंबंधी ट्विट केल्यानंतर त्यांचे अकाउंट बंद केले.
(हेही वाचा : आता जयंत पाटलांच्या शिक्षण संस्थेवर भूखंड घोटाळ्याचा आरोप!)
Join Our WhatsApp Community