भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्ष पूर्ण होत असून देशभरात आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. मात्र मोदी सरकारच्या या अभियानावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. एकीकडे शिवसेनेकडून हर घर तिरंगा यावर ट्वीट करत घराचा नाही पत्ता, ज्यांच्याकडे घरच नाही ते तिरंगा लावणार कुठे, असा प्रश्न विचारत विरोधात्मक प्रतिक्रिया देण्यात आली आहे. यावर भाजपकडून याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
(हेही वाचा – Azadi ka Amrit Mahotsav : स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाला वेगळ्या पद्धतीने फडकावला जातो ध्वज! काय आहे फरक?)
‘हर घर तिरंगा’ अभियानावरून Twitter वॉर!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हर घर तिरंगा या अभियानावर एक ट्वीट करून भाजपला सवाल विचारला आहे, मायबाप सरकारने कार्यक्रम दिला आहे, हर घर तिरंगा, घर घर तिरंगा. घराचा नाही पत्ता… ज्यांच्याकडे घरच नाही ते तिरंगा लावणार कुठे? या ट्वीटवरच भाजप कडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
भाजपने ट्वीट करून असे म्हटले की, 4 व्यक्तींना राहण्यासाठी 2 बंगल्यांची गरज लागते का? त्यातील एखादी खोली देण्याची तयारी दाखवणार का? 600 कुटुंबियांना बेघर करणाऱ्याला पाठीशी घालणारे असे प्रश्न करू नये. मुख्यमंत्री होते 2.5 वर्ष, अभ्यास केला असता तर ९ लाख घरे महाराष्ट्रात दिली आहेत केंद्राने हे देखील समजलं असत.
4 व्यक्तींना राहण्यासाठी 2 बंगल्यांची गरज लागते का? त्यातील एखादी खोली देण्याची तयारी दाखवणार का?
६०० कुटुंबियांना बेघर करणाऱ्याला पाठीशी घालणारे असे प्रश्न करू नये.
मुख्यमंत्री होते 2.5 वर्ष, अभ्यास केला असता तर ९ लाख घरे महाराष्ट्रात दिली आहेत केंद्राने हे देखील समजलं असत. https://t.co/0IweOVe2pJ
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 13, 2022
भारत सध्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यासाठी संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. यंदा देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत केंद्राने 13 ते 15 ऑगस्टदरम्यान, ‘हर घर तिरंगा’ (प्रत्येक घरात ध्वजारोहण) उपक्रम राबवण्यात येत आहे. शासनाच्या सूचनेनूसार हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत असून राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर तिरंगा फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.
Join Our WhatsApp Community