पंतप्रधान मोदींसह ‘या’ दिग्गजांची Twitter ने हटवली ‘ब्लू टिक’, केला ‘हा’ बदल

178

मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरने काही दिवसांपूर्वीच आपली पेड सबस्क्रिप्शन सर्व्हिस ट्विटर ब्लूला लॉंच केले आहे. या सर्व्हिस अंतर्गत युजर्सला ठराविक रक्कम मोजून व्हेरिफाईड टीक मिळणार आहे. नवीन व्हेरिफिकेशन सिस्टम अंतर्गत ट्विटरवर आता अनेक बदल दिसू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या अकाऊंटवरून ट्विटरने ब्लू टीक हटवले आहे. तर या दिग्गज नेत्यांच्या हँडलवर ग्रे टिक्स दिसू लागले आहेत.

(हेही वाचा – राज ठाकरेंनी गडकरींशी फोनवरून साधला संवाद अन् म्हणाले, ‘आता तुम्हीच…’)

या बदलानंतर आता वेगवेगळ्या अकाऊंटसाठी ब्लू, गोल्डन, ग्रे रंगांची व्हेरिफाईड टीक पाहायला मिळणार आहे. ट्विटरवरून हे बदल सुरू झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबतच इतर सरकारी संस्थांच्या अकाऊंट्सच्या ट्विटर हँडवर ग्रे टीक पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बाइडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांच्या ट्विटर प्रोफाइलवर ग्रे टीक दिसत आहे.

grey tick

ट्विटरवर या ग्रे टिकचे नियम अद्याप पूर्णपणे लागू झालेला नाही. आजही अनेक राजकारण्यांच्या हँडलवर ब्लू टीक दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या अकाऊंटवर अजूनही ब्लू टीक दिसत आहे. 13 डिसेंबर रोजी ट्विटरने व्हेरिफिकेशनचे धोरण बदलले असून हे तीन रंगांच्या श्रेणींमध्ये विभागलेले आहे. ट्विटरने व्हेरिफाय पॉलिसीत बदल केला असून, या अंतर्गत कंपन्यांना गोल्ड, सरकारी संस्था आणि व्यक्तींना ग्रे आणि सर्वसामान्य व्यक्तींना ब्लू टीक मिळणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.