मुंबईत BJP आणि संघाची दोन दिवसीय बैठक; परळ मुख्यालयात राज्यातील नेत्यांची उपस्थिती

60
मुंबईत BJP आणि संघाची दोन दिवसीय बैठक; परळ मुख्यालयात राज्यातील नेत्यांची उपस्थिती
मुंबईत BJP आणि संघाची दोन दिवसीय बैठक; परळ मुख्यालयात राज्यातील नेत्यांची उपस्थिती

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधानसभेतील यशानंतर भाजपा (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी परळ येथील संघ मुख्यालयात दोन दिवसीय बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (CM Devendra Fadnavis) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, (Chandrashekhar Bawankule) तसेच राज्यातील भाजपाचे (BJP) बडे नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

विचारमंथनाचे उद्दिष्ट

राज्यातील आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी रणनीती तयार करणे, तसेच विधानसभेतील यशानंतर सरकारच्या प्रशासनातील पुढील वाटचालीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

भाजपा (BJP) आणि संघाने संयुक्तपणे राज्यातील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला असून, समाजातील विविध घटकांपर्यंत भाजपाची धोरणे आणि विकासकामे प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी नव्या उपाययोजनांवर विचार केला जात आहे.

(हेही वाचा – Guardian Minister : पालकमंत्री पदाची यादी जाहीर; तीन जिल्ह्यासाठी सह-पालकमंत्री पदाची निर्मिती)

महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जात असून, विरोधकांच्या टीकेला कसे उत्तर द्यायचे आणि जनतेत पक्षाचा विश्वास कसा वाढवायचा, यावर सखोल चर्चा होत आहे. तसेच, महाविकास आघाडीच्या संभाव्य रणनीतींना सामोरे जाण्यासाठी भाजपा-आरएसएसची भूमिका ठरवली जात आहे.

पक्षाची आगामी योजना

आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपाला (BJP) निवडणुकीत आवश्यक सामाजिक जोडणी मजबूत करण्याबाबत सल्ला दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपाची गावे आणि शहरांमध्ये पायाभूत कामे अधिक प्रभावी करण्याची योजना ठरवली जात आहे. या बैठकीत भाजपा-आरएसएसचा समन्वय अधिक मजबूत होईल आणि आगामी निवडणुकांसाठी दिशा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.