सहायक आयुक्त Nitin Shukla यांच्या बदलीमुळे भाजपात उभे दोन गट

1460
सहायक आयुक्त Nitin Shukla यांच्या बदलीमुळे भाजपात उभे दोन गट
सहायक आयुक्त Nitin Shukla यांच्या बदलीमुळे भाजपात उभे दोन गट
  • मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबई महापालिकेचे नवनियुक्त सहायक आयुक्त नितीन शुक्ला (Nitin Shukla) यांनी अवघ्या दीड महिन्यांतच एफ उत्तर विभागातून बी विभागांत बदली झाल्याने आता त्यांच्या बदलीवरून भाजपातच (BJP) दोन गट पडले आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्यांच्या दबावामुळे शुक्ला यांची बदली झालेली असतानाच भाजपाचा एक गट मात्र, या बदलीचा विरोध करत आहे. त्यामुळे भाजपात उघड उघड दोन गट दिसून येत असून त्यातच येथील स्थानिक रेसिडेन्सी असोशिएशननेही शुक्ला यांच्या बदलीचा निषेध नोंदवत एफ उत्तर विभागात निदर्शने केली आहे.

महापालिकेचे नवनियुक्त सहायक आयुक्त नितीन शुक्ला (Nitin Shukla) यांची शीव माटुंगा या महापालिकेच्या एफ उत्तर विभागात नियुक्ती झाल्यानंतर माटुंगा पूर्व येथील परवानाधारक फुलविक्रेत्यांच्या अतिक्रमित आणि अनधिकृत गाळ्यांवर कारवाई केली. तसेच लालबहादूर शास्त्री मार्ग व भांडारकर मार्गावरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून सिंघम बनण्याचा प्रयत्न केला होती. त्यानंतर त्यांनी येथील पंजाबी गल्लीतील जगन्नाथ मठातील बांधकामावर कारवाई करण्यासाठी नोटीस बजावली होती. यामुळे भाजपाचे आमदार तमिल सेल्वन, माजी विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) हे आक्रमक झाले आणि त्यांनी चुकीच्या पध्दतीने कारवाई करणाऱ्या सहायक आयुक्तांची बदली करण्याची मागणी केली होती, त्यानुसार ही बदली करण्यात आल्याचे बोलले जात आहे. तसेच भाजपाच्या माजी नगरसेविका नेहल शाह, कृष्णावेणी रेड्डी यांनीही शुक्ला (Nitin Shukla) यांच्या चुकीच्या कारवाईचा निषेध केला होता.

(हेही वाचा – Vehicle : जुने वाहन स्वेच्छेने मोडीत काढल्यास नवीन वाहनासाठी १५ टक्के कर सवलत; मंत्रिमंडळाचा निर्णय)

शुक्ला यांनी अतिक्रमणांविरोधात मोहिम हाती घेतली असली तरी चुकीच्या पध्दतीने कारवाई केली होती. येथील नागरिकांना प्रथम पदपथ फेरीवालामुक्त हवेत तसेच खाण्याचे स्टॉल्सनी जागा अडवून ठेवले, त्यामुळे लोकांना चालता येत नाही. त्यामुळे अशा अनधिकृत स्टॉल्स अणिक फेरीवाल्यांविरोधात कारवाई होणे अपेक्षित असताना परवानाधारक स्टॉल्सधारकांना टार्गैट केल्याने ते प्रथम टीकेचे धनी झाले होते. लोकांना फुलविक्रेत्यांमुळे चालताना त्रास होत नाही तर समोरील पदपथावरुन चालताना आणि शास्त्री मंडईबाहेर बसलेल्या फेरीवाल्यांमुळे चालताना त्रास होतो,असे असताना त्यांच्यावर कारवाई केली नाही. त्यामुळे कारवाई करण्याची भूमिका चांगली असली तरी चुकीच्या पध्दतीने त्यांनी कारवाई केल्याने त्यांची बदली झाली.

माजी विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी शुक्ला (Nitin Shukla) यांनी अतिक्रमण हटवण्याची मोहिम हाती घेतली याचे मी स्वागत करतो असे स्पष्ट करतो, परंतु त्यांनी सर्वप्रथम ज्या फेरीवाले आणि हातगाड्यांमुळे स्थानिकांना त्रास होतो त्यावर कारवाई करायची सोडून ते जगन्नाथ मठापर्यंत कारवाई करायला पोहोचले. मग आमच्या मठापर्यंत जावून जर तुम्ही पोहोचला असाल तर आम्ही गप्प कसे कसे बसायचे? या भागांत ४४ इमारतींचे बांधकाम होत आहे आणि त्याठिकाणी पर्यावरणाच्या नियमांनसार अंमलबजावणी होत नाही. त्यावर कारवाई करण्याची हिंमत यांची नाही. कारण हे फक्त विकासकांच्या इशाऱ्यानुसारच काम करत होते आणि यांच्या कार्यालयाबाहेर विकासकाची रांग लागलेली पहायला मिळत होती,असा आरोप राजा यांनी केला.

(हेही वाचा – E-Bike Taxi : राज्यात लवकरच बाईक टॅक्सी सेवा; मंत्रिमंडळाची ई-बाईक धोरणाला मंजुरी)

तर भाजपाचे दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर (Rajesh Shirwadkar) यांनी शुक्ला (Nitin Shukla) यांच्या कारवाईचे समर्थन करत ज्यांना अनधिकृत बांधकामे वाचवायची आहेत त्यांना शुक्ला नको आहेत, तर आम्हाला शुक्ला हवेत आहेत. त्यामुळे ज्यांना शुक्ला नको आहेत ते त्यांना विरोध करत आहेत, तर आम्हाला अनधिकृत बांधकामे नको आहेत, त्यामुळे आम्ही शुक्लांचे समर्थन करून त्यांच्या बदलीचा निषेध करत आहोत. त्यामुळे शुक्लाची बदली पुन्हा बी विभागाऐवजी एफ उत्तर विभागांत करावी अशी मागणी शिरवडकर यांनी केली आहे.

दरम्यान माटुंगा रेसिडेन्सींच्यावतीने येथील रहिवाशांनी नितीन शुक्ला (Nitin Shukla) यांच्या बदलीचा निषेध करत त्यांची बदली रद्द करून पुन्हा त्यांना या विभागांत आणले जावे अशी मागणी केली. यावेळी येथील रहिवाशांनी एफ उत्तर विभाग कार्यालयाबाहेर शुक्ला यांच्या बदलीचा निषेध करत प्रशासना विरोधात तसेच भाजपा (BJP) विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. यामध्ये प्रतीक्षानगर, पाच उद्यान, पारशी रोड, माटुंगा, शीव, वडाळा येथील रहिवाशी तसेच अभियंता संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.