पुणे महानगरपालिकेत गेल्या आठवड्यात किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांच निलंबन करण्यात आलं आहे.
ठाण्याच्या 2 कर्मचाऱ्यांचे निलंबन
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या 2 कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले असून, CISF च्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली होती. दिलीप गोरे आणि सतीश शिंदे असे निलंबन झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. भाजपनेते किरीट सोमय्या आज पुन्हा पुणे महानगर पालिकेतआले त्यावेळी त्यांनी पुण्यात दाखल होताच, पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
(हेही वाचा – आदित्य ठाकरेंना गोव्यात गेलेल्या सेना नेत्यांविषयी शंका! कोणती ते वाचा…)
ठाकरे सरकारवर सोमय्यांचा हल्लाबोल
पुणे विमानतळावर दाखल होताच किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. किरीट सोमय्या म्हणाले, संजय राऊतच्या मित्र परिवाराच्या पार्टनरची कंपनी आहे. या कंपनीला कंत्राट दिलेच कसे?, पीएमआरडीएकडे या कंपनीचे काहीही कागदपत्रे नाहीत, अर्जही नाही आणि तरी सुद्धा त्यांना कंत्राट दिले. उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या मदतीने कोविडमध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे, कारवाई व्हायलाच हवी. यासह पुढे किरीट सोमय्या असेही म्हणाले, कोविड घोटाळा करणारी हेल्थलाईन लाईफलाईन कंपनीवर कारवाई करा. गेल्यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाने 100 गुंड पाठवले होते, तक्रार मनपात होऊ दिली नाही. आता पाहतो कशी कारवाई करणार नाहीत.
Join Our WhatsApp Community