‘मी सावरकर’ कार्यक्रमाची दोन तिकिटे उद्धव ठाकरेंना पाठवणार – आशिष शेलार

88

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये बुधवार, ५ एप्रिलला ‘मी सावरकर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची दोन तिकिटे उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना सन्मानपूर्वक पाठवणार असल्याची माहिती मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली.

( हेही वाचा : Agitation Against Arvind Sawant: अरविंद सावंतांविरोधात ठाण्यात रिक्षावाल्यांचे आंदोलन )

वांद्रे येथे आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना शेलार म्हणाले, हा कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम नव्हे; हा सावरकर भक्तांचा कार्यक्रम आहे. केवळ हिंदू जन आक्रोश मोर्चावर आक्षेप, हिंदू नववर्ष यात्रेची अडवणूक आणि रामनवमीच्या मालवणीतील यात्रेतून पळवणूक या उद्धवजींच्या भूमिकेवर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे. मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्याबरोबर उभे राहण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी करेल याबद्दल दुमत नाही, असेही ते म्हणाले.

भारतामध्ये एकूण २,३३४ राजकीय पक्ष असून महाराष्ट्रात एकूण १४५ नोंदणीकृत पक्ष आणि २ राज्यस्तरीय (मनसे व शिवसेना) पक्ष आहेत. या सगळ्या पक्षांचे विविध राजकीय कार्यक्रम आहेत, ध्येयधोरणे आहेत. पण महाराष्ट्रातील एकमेव उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा असा आहे की, त्यांचा कुठला कार्यक्रम नाही, ध्येयधोरणे नाही, विचार नाही. केवळ भाजप काय करतो आहे. इतर पक्ष काय करीत आहेत, त्याची धोरणे काय आहेत. याच्या कार्यक्रमावर भाष्य करा, हे चालू आहे. तुमचं ध्येय, धोरण विचारधारा काय? काही नाही, अशी टीका शेलार यांनी केली.

दुसऱ्याच्या घरात काय झाले तर पेढे वाटायचे. स्वतःच्या मनासारखे झाले नाही तर रडत बसायचे असे उद्धव ठाकरे यांचे सुरू आहे. या पलीकडे काहीही नसलेला पक्ष तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे. १४५ पक्षांमधील सगळ्यात टवाळखोर पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. या टवाळांनी परवा सभा घेतली. महाराष्ट्र विकास आघाडीची म्हणे वज्रमूठ. यांना साधं कळत नाही की, वज्रमूठ एका माणसाची असते. १६ जण एकत्र मिळून करतात त्याला हात मिळवणी म्हणतात त्याला वज्रमूठ म्हणत नाहीत. १६ चोरांनी मिळून केलेली ही हात मिळवणी आहे, असेही शेलार म्हणाले.

राहुल गांधीना माफी मागायला सांगा

आम्ही उद्धवजी यांना नम्र विनंती केली की, राहुल गांधी यांना माफी मागायला सांगा आणि मग त्यांच्याबरोबर बसा. त्यांनी हे केलं नाही. राहुल गांधी यांनी सावरकरांची माफी मागितली की, प्रकरण तात्पुरतं बाजूला ठेवलं त्याचं स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी द्यावे. महाराष्ट्र हे जाणू इच्छितो आहे. राहुल गांधी यांनी या प्रकरणात बोलायचं टाळलं, थांबवलं आहे. राहुल गांधी किंवा त्यांच्या पक्षाने यावर काहीही म्हंटल नाही. राहुल गांधी यापुढे सावरकरांचा अपमान करणार नाहीत असे म्हटल्याचे ठोस पुरावे उद्धव ठाकरे यांनी द्यावेत. केवळ प्रकरण अंगावर येत आहे म्हणून मतासाठी हे केलं जात आहे. देशभक्तांचा, देशाचा, सावरकरांचा, हिंदूचा आणि भारताचा राहुल गांधी यांनी अपमान केलाच पण उद्धवजी हे महाराष्ट्र द्रोह करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत, अशी टीकाही शेलार यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.