उबाठाला आता जय भवानी, जय शिवाजी घोषणेची गरज नाही ?; Ambadas Danve यांचे विधान चर्चेत

111
उबाठाला आता जय भवानी, जय शिवाजी घोषणेची गरज नाही ?; Ambadas Danve यांचे विधान चर्चेत
उबाठाला आता जय भवानी, जय शिवाजी घोषणेची गरज नाही ?; Ambadas Danve यांचे विधान चर्चेत

उबाठा गटाने हिंदुत्व सोडल्याची टीका वारंवार होत असते. विधानसभेतील दारूण पराभवानंतर आपण हिंदुत्व कसे सोडलेले नाही, हे सांगण्यात कोणतीही कसूर ठेवलेली नाही. असे असूनही पक्षाचे नेते करत असलेल्या विधानांमुळे उबाठाची पोलखोल होत आहे, अशी चर्चा होत आहे.

(हेही वाचा – Sri Sri Radha Gopinath Temple : गोपीनाथ मंदिराचा रहस्यमयी इतिहास तुम्हाला माहित आहे का ?)

उबाठाचे नेते तथा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलेले असेच विधान चर्चेत आले आहे. ‘राज्यात आता ‘जय भवानी, जय शिवाजी’चा (Jai Bhavani, Jai Shivaji) नारा देत मते मिळवण्याचे दिवस गेलेत’, असे अजब विधान उबाठा गटाचे नेते तथा कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना केले आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना खरेच बदलली का? असा प्रश्नही यासंबंधी कार्यकर्त्यांना पडला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्ज येथे उबाठा गटाचा मेळावा झाला. या मेळाव्यात अंबादास दानवे यांनी उपरोक्त विधान केले.

‘जय भवानी, जय शिवाजी’ ही घोषणा ही एकेकाळी शिवसेनेची ओळख होती. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाभोवती फिरत आहे. असे असतांना आता हिरव्या मतपेटीमुळे उबाठाला भवानी माता आणि शिवरायांच्या घोषणेची गरज राहिलेली नाही, असे मत राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे.

उबाठा गटाने विधानसभा निवडणुकीतील हाराकिरी बाजूला ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. याशिवाय त्यांनी राज्यभरात या निवडणुका स्वबळावर लढण्याचेही संकेत दिलेत. यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते अंग झटकून कामाला लागल्याचा दावा केला जात आहे. अशा स्थितीत नेत्यांची ही बेजबाबदार विधाने त्यांना अडचणीत आणू शकतात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.