गेली ३० वर्ष मुंबई पदवीधर मतदारसंघावर (Graduate Constituency) वर्चस्व ठेवून असलेल्या उबाठा (UBT) गटाला भाजपने यावेळी आव्हान दिले आहे. संपूर्ण मुंबईतील शिवसेना या मतदारसंघात अनिल परब (Anil Parab) यांनी कामाला लावली आहे. शिवसेनेत सोबतच आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेने देखील काम सुरू केले असल्याचे मागील आठवडाभर दिसून येत आहे.
(हेही वाचा – संविधान घेऊन संविधानाबाबत खोटं बोलण्याचं पाप करत आहात; Chitra Wagh यांचा Rahul Gandhi यांच्यावर निशाणा)
पदाधिकाऱ्यांनी केली मोर्चे बांधणी
शिवसेना भवनात शिवसेनेचे पदाधिकारी ज्यामध्ये विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख तसेच युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या वाटून देण्यात आले आहेत. मतदार नोंदणी प्रमाणेच मतदार मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रत्येकाला विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. ठरवून दिलेल्या मतदाराला तोच पदाधिकारी फोन करून करून आपण मतदानाच्या दिवशी कामावर किती वाजता जाता ? किंवा कोठे कामाला जाता ? असे प्रश्न विचारत आहे. जेणेकरून मतदाराला मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी गाडीची व्यवस्था केली असल्याचे देखील संबंधित पदाधिकारी आधीच सांगून ठेवत आहेत. या सर्वांमुळे शिवसेना उबाठा गटाकडून उमेदवार अनिल परब यांनी निवडणुकीची चांगलीच मोर्चे बांधणी केली असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई पदवीधरमध्ये एकूण आठ उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात होणार आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात १२ हजार पदवीधर उमेदवारांची नावे समाविष्ट करण्यात आली नाहीत, या अनिल परब यांच्या आरोपामुळे ही निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मुंबईतील १ लाख २० हजार ६७३ मतदार अनिल परब आणि किरण शेलार यांचे भवितव्य बुधवारी निश्चित करतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community