ऐन निवडणुकीच्या प्रचारात दक्षिण मध्य मुंबईत UBT आणि Congress आमनेसामने

सर्व काही आलबेल असल्याचे भासवले जात असताना मुंबईतील महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. उमेदवार अनिल देसाई व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीची घटना समोर आली.

254
Shiv Sena UBT : शिवसेना भवनच्या अंगणात देसाईंना शिवसैनिकांनी नाकारले

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील 6 जागांवर निवडणूक होणार आहे, त्याच्या प्रचाराला जोर आला आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या प्रचारात दक्षिण मध्य मुंबईत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी जेव्हा उबाठाचे उमेदवार अनिल देसाई चेंबूरमधील पांजर पोळ येथे प्रचाराला आले तेव्हा उबाठाचे (UBT) कार्यकर्ते आणि कॉँग्रेसचे (Congress) कार्यकर्ते आमने सामने आले.

अनिल देसाई यांना माघारी फिरावे लागले

सर्व काही आलबेल असल्याचे भासवले जात असताना मुंबईतील महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. उमेदवार अनिल देसाई व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीची घटना समोर आली. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे. मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीबरोबर महायुतीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे (UBT) उमेदवार अनिल देसाई हे ठिकठिकाणी सभा आणि बैठका घेत आहेत. चेंबूरमधील पांजर पोळ या ठिकाणी ते गेले असता काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांचा आणि अनिल देसाईंच्या कार्यकर्त्यांमध्ये जुन्या वादावरून पुन्हा वाद उफाळला. अनिल देसाईंनी या ठिकाणाहून निघून जावे, त्यांनी या ठिकाणी प्रचाराला येऊ नये, अशी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागणी केली. त्यानंतर दोन्ही गटामध्ये काही वेळ वादाचे रुपांतर पाहायला मिळाले.

(हेही वाचा Narendra Modi नक्कीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक)

जुन्या व्हिडिओमुळे घटना घडली  

प्रचाराच्या दरम्यानचा हा वादाचा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे. मात्र उबाठा (UBT) आणि काँग्रेसमध्ये हा वाद जुना असून त्यातूनच ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. निवडणुकीला आता अवघे चारच दिवस राहिले असताना काँग्रेस आणि ठाकरे गटातील (UBT)  हा वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून काय पावले उचलली जातात हे पाहावे लागेल. दक्षिण मध्य मुंबई लोकसभेची जागा ही ठाकरे गटासाठी (UBT)  प्रतिष्ठेची जागा असून त्या ठिकाणी अनिल देसाई हे निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे राहुल शेवाळे हे आहेत. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघामध्ये विधानसभेचे अणुशक्तीनगर आणि चेंबूर हे मुंबई उपनगर जिल्ह्यातले दोन मतदारसंघ येतात. तर मुंबई शहर जिल्ह्यातले धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा आणि माहीम हे विधानसभा मतदारसंघ येतात. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (UBT)  आमदार प्रकाश फातर्फेकर चेंबूरमधून आणि धारावीतून काँग्रेसच्या (Congress) वर्षा गायकवाड आमदार आहेत. या दोन्ही आमदारांचा आणि त्यांच्या पक्षाचा अनिल देसाईंना पाठिंबा आहे. तर नवाब मलिक हे अणुशक्ती नगरचे आमदार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.