मुंबईतील धारावी येथील एका मशिदीचा अनधिकृत भाग पाडण्यासाठी महापालिकेचे अधिकारी तेथे पोहोचल्यानंतर मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी शेकडो लोकांचा जमाव मशीद परिसराजवळ गोळा झाला होता. या तणावाला उद्धव ठाकरे आणि वर्षा गायकवाड जबाबदार असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. जास्तीत जास्त लोकांना जमवण्यासाठी एक भडकावणारे पत्र व्हायरल करण्यात आले, असाही आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
21 सप्टेंबर रोजी धारावीतील एका मशिदीचा अवैध पाडण्यावरून मोठा तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाने मुंबई महापालिकेच्या गाडीवर दगडफेक करत रस्त्यावरच ठिय्या मांडला होता. या घटनेवर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी भाष्य करत उद्धव ठाकरे आणि वर्षा गायकवाड यांचे हे कटकारस्थान आहे. मुस्लिम नेत्यांना हाताशी धरून बोगस, बेनामी आणि उसकावणारे पत्र सगळ्यांना पाठवण्यात आले. 21 सप्टेंबर रोजी मशिदीच्या अवैध बांधकामावर महापालिकेची कारवाई होणार होती, त्यामुळे 20 सप्टेंबर रोजीच कळवा, मुंब्रा येथून बसेस भरून लोक आणण्यात आले, असे सोमय्या म्हणाले.
(हेही वाचा बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी Akshay Shinde चा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात मृत्यू)
किरीट सोमय्या म्हणाले की, गंमतीदार गोष्ट म्हणजे मशिदीतील सुमारे 1000 स्वेअर फूट 40 फूट उंचीचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे वर्षा गायकवाड यांनी माहीत होते. त्या मशिदीतील ट्रस्टीने कबूल केले असून तसे लिहून दिले आहे. जाणून बुजून मस्जिद तोडने मोदी के लोग आ रहे है, असे सांगून या लोकांना भडकावण्यात आले. ज्यांच्या मोबाईलमधून हे पत्र व्हायरल करण्यात आले. ज्यांनी या लोकांना भडकावले, ते ठाकरे गटाचे नेते, वर्षा गायकवाड यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली आहे. याबाबत ते धारावी पोलिसांत जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Join Our WhatsApp Community