शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांनी उर्दूमध्ये पत्र काढले आहे. मराठवाड्यामध्ये ‘खान हवा की बाण हवा’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याकडून बाण निघून गेला आहे, तर फक्त खान उरला आहे. ठाकरे गटाचा उमेदवार हारून खान यांच्या नावातच ‘हरू’ आहे. त्यामुळे तो कसा जिंकणार, असा प्रश्न मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केला.
(हेही वाचा – देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली, मालाडमध्ये अभूतपूर्व विकास होईल – केंद्रीय मंत्री Piyush Goyal)
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची दिंडोशी मालाड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या मतदारसंघातील मनसेचे उमेदवार भास्कर परब उभे आहेत. त्यांचा प्रचार करतांना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
विधानसभा निवडणुकीदरम्यान (Maharashtra Assembly Election 2024) उबाठाच्या वतीने वर्सोवा विधानसभा मतदारसंघात हारून खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निर्णयावर राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आता एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आहे, तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत केवळ खान राहिले आहेत, अशा शब्दांत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community