उबाठाने एमआयएमसोबत केली तडजोड; वाह रे हिंदुत्व; Sanjay Shirsat यांचा गंभीर आरोप

माझीही फाइट एमआयएमबरोबरच आहे. कारण माझ्याकडे उबाठा गटाचा उमेदवार नाही, तर तो एमआयएमचा उमेदवार आहे, असे संजय शिरसाट म्हणाले.

89

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे, प्रचाराला जोर आला आहे. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उबाठावर गंभीर आरोप केला आहे. उबाठाने एमआयएमसोबत तडजोड केली आहे, वाह रे हिंदुत्व, असे शिरसाट म्हणाले. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. यावेळी येते शिंदेसेना विरूद्ध उद्धवसेना, असा सामना होत आहे. चौथ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात राजू शिंदे यांना उभे करून उद्धवसेनेने आव्हान दिले आहे.

(हेही वाचा Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण ? अमित शाह म्हणाले…)

काय म्हणाले शिरसाट? 

माझीही फाइट एमआयएमबरोबरच आहे. कारण माझ्याकडे उबाठा गटाचा उमेदवार नाही, तर तो एमआयएमचा उमेदवार आहे. निवडणुकीत काय काय तडजोड होते, हे मी बघत आहे. माझ्याकडचा उमेदवार बोलला,  ‘तुम्ही तिकडे उभे राहा, आमची मते तिकडे देऊन टाकू आणि तुमची मते मला देऊन टाका.’ लाज वाटायला हवी यांना लाज. वारे उबाठा तुझं हिंदूत्व…! हे हिंदूत्व असतं…? याला म्हणतात हिंदुत्व…? शहरामध्ये काय चाललंय? ठरवून करत आहेत ठरवून. आमचे दोन आहेत, ते तुम्ही निवडून आणा, आम्ही तुमचे निवडून आणतो.अरे मतासाठी एवढी लाचारी पत्करायची असेल, तर आम्हाला सांगा, आम्ही बिनविरोध निवडून देतो. पण गुडघे टेकू नका रे गुडघे टेकू नका…!, असेही संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.