गेली सहा वर्ष भाजपाची साथसोबत केलेले गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी शुक्रवारी (२६ जुलै) भाजपाला रामराम करत उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उबाठात प्रवेश करत घरवापसी केली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी कुथे यांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. कुथे यांच्या प्रवेशाने पूर्व विदर्भात उबाठाला मजबुती मिळाली आहे. (UBT)
येत्या ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्ष प्रवेशाचे सोहळे होऊ लागले आहेत. त्यानुसार विदर्भ तसेच मराठवाड्यातील कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर जाऊन उबाठात प्रवेश केला. प्रवेश केलेले रमेश कुथे हे मूळ शिवसेनेत होते. ते १९९५ आणि १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. मात्र, त्यानंतर २०१८ मध्ये कुथे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. (UBT)
(हेही वाचा – Unauthorized Construction : माटुंगा पश्चिम येथील स्टेटस हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई)
बावनकुळेंच्या यांच्या एका वक्तव्यामुळे नाराजी
दरम्यान, उबाठात प्रवेश केल्यानंतर कुथे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर नाराजी व्यक्त केली. बावनकुळे यांच्या एका वक्तव्यामुळे आमची पक्षात फसवणूक झाल्याची जाणीव झाली. ते एका बैठकीत आम्हाला म्हणाले की, आपल्या पक्षात येण्यासाठी नेत्यांची मोठी रांग लागली आहे. जे येतात त्यांना होकार द्या आणि काहीजण जात असतील तर त्यांना जाऊ द्या. कारण आपण प्रत्येकालाच आनंदी ठेऊ शकत नाही. येणाऱ्यांना येऊ द्या. आपल्या पक्षात १०० लोक येतील, त्यावेळी पाच जण पक्ष सोडून जातील. याचा अर्थ आपला पक्ष ९५ टक्के नफ्यात आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांचे ते विधान ऐकून असे वाटले की आपली फसवणूक झाली आहे. त्यामुळे मी उबाठात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आज मी मातोश्रीवर आलो, उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आणि अधिकृतरित्या उबाठात प्रवेश केला आहे. त्यामुळे कुथे हे आगामी विधानसभा निवडणूक उबाठाच्या चिन्हावर लढण्याची शक्यता आहे. दरम्यान, रमेश कुथे यांच्यासह इतर स्थानिक भाजपा नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उबाठात प्रवेश केला. शिवसेनेचे जालना जिल्ह्यातील बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या डॉ. सुरेशकुमार कासर, मुस्लिम समाजाचे अभ्यासक प्रा. डॉ. शफी शेख, बदनापूरचे सरपंच राजेंद्र भैय्या जैस्वाल, विष्णू मदन, भाजपा पदाधिकारी रामेश्वर फंड आदींनी शिवसेनेचा झेंडा हातात घेतला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community