UBT Lok sabha Candidate: उबाठा गटाची दुसरी यादी जाहीर; कल्याणमधून कोण देणार महायुतीला टक्कर

273
UBT Lok sabha Candidate: उबाठा गटाची दुसरी यादी जाहीर; कल्याणमधून कोण देणार महायुतीला टक्कर
UBT Lok sabha Candidate: उबाठा गटाची दुसरी यादी जाहीर; कल्याणमधून कोण देणार महायुतीला टक्कर

भाजपचे नेते उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उबाठा गटात प्रवेश केला. या वेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आणखी ४ उमेदवार (UBT Lok sabha Candidate) जाहीर केले. त्यात कल्याण लोकसभा मतदार संघातून वैशाली दरेकर यांना संधी देण्यात आली आहे. तर जळगावमधून करण पवार, हातकणंगलेतून सत्यजित आबा पाटील व पालघर लोकसभा मतदार संघातून भारती कांबळी यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. सांगलीच्या जागेबाबत बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)म्हणाले, “उद्यापासून या जागेवर निवडणूक प्रचार सुरू करणार आहोत. मैत्रीपूर्ण लढत असे काही नाही. तुम्ही एकतर मैत्री करा किंवा भांडण करा. उत्तर मुंबई आम्ही मित्र पक्षाला विचारतोय. आमच्याकडे उमेदवार आहेत; पण मित्र पक्षाला विचारतोय”, असं ठाकरे यावेळी म्हणाले. (UBT Lok sabha Candidate)

(हेही वाचा-Eddie Murphy : अमेरिकन विनोदी अभिनेता आणि गायक एडी मर्फी )

मी प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल काही बोलणार नाही…

“हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत राजू शेट्टी यांच्यासोबत बोलणी फिसकटली नाही. हातकणंगले आणि सांगली आम्ही लढत आहोत. हातकणंगले हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. तिकडचे राजकीय गणित पाहता आम्हाला कार्यकर्त्यांनी विनंती केली की, आमचा उमेदवार द्यावा. राजू शेट्टी यांना म्हटले की, आम्ही पाठिंबा देऊ तुम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढवा, त्यांनी नकार दिला. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी नागपूरमध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला. मी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांच्याबद्दल काही बोलणार नाही. आमचे जुने ऋणानुबंध आहेत. या वेळेस जमलं नाही. पण ते हुकूमशाहीविरोधात एकत्र येतील असं वाटलं होतं. मी पूर्ण प्रयत्न केला, संविधान वाचविण्यासाठी एकत्र यावं. मी कार्यकर्त्यांना सांगितलं त्यांनी कितीही आरोप केला तरीही बोलू नका, अशा सूचना केल्या आहेत.” अशी माहिती ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिली. (UBT Lok sabha Candidate)

(हेही वाचा- Maharashtra crime: राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; 37 लाखांचा मद्य साठा जप्त)

काय म्हणाले उन्मेश पाटील ?

जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil)यांनी आज (३ एप्रिल) उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. या वेळी उन्मेश पाटील म्हणाले, “महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवत, भारताला मराठी बाणा दाखवणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आज मी प्रवेश करत आहे. मी भाजपा सोडून ठाकरे गटात प्रवेश करत असल्याने मला अनेक जण विचारत आहेत की, उमेदवारी मिळाली नाही; म्हणून तुम्ही नाराज आहात का? मी या सर्वांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, राजकारण करताना आमदार, खासदार होणं हे एवढंच माझं ध्येय नव्हतं. मी खूप चांगल्या हेतूने काम करत होतो. परंतु, राजकारणात काम करताना, आमदार असताना आज आपण जी शासकीय योजनांची जत्रा पाहतोय, त्याचा पॅटर्न आम्ही चाळीसगावात राबवला होता. दुर्दैवाने त्याला किंमत मिळाली नाही. मी मागणी न करता मला मागील वेळेस लोकसभा उमेदवारी मिळाली. परंतु, यावेळी मला एका भावाने दगा दिला, तरी दुसरा भाऊ माझ्याबरोबर आहे आणि याचा मला आनंद आहे.” असं ते म्हणाले. (UBT Lok sabha Candidate)

हे पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.