UBT Shiv Sena Vs Gujrati : उबाठा शिवसेनेचा ढोंगीपणा उघड; एकीकडे गुजरात्यांना विरोध, दुसरीकडे गुजराती भाषेतूनच प्रचार

मुलुंडमध्ये मागील काही महिन्यांपूर्वी मराठी आणि गुजराती असा वाद पेटला असून त्यातच घाटकोपरमध्ये लावलेला 'मारु घाटकोपर' हा गुजरातीमधील बोर्ड उबाठा शिवसेनेने काढून टाकला होता.

241
UBT Shiv Sena Vs Gujrati : उबाठा शिवसेनेचा ढोंगीपणा उघड; एकीकडे गुजरात्यांना विरोध, दुसरीकडे गुजराती भाषेतूनच प्रचार

घाटकोपर येथील गुजराती बहुल सोसायटी परिसरात मराठी पत्रके वाटण्यास विरोध केला म्हणून गळा काढणाऱ्या उबाठा शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील उमेदवार अरविंद सावंत यांनी आपल्या प्रचाराची पत्रके चक्क गुजराती भाषेत छापली आहेत. एका बाजुला भाजपा गुजराती समाजाला प्रोत्साहन देत असल्याचा आणि त्यांच्या भाषेचा वापर करत असल्याचा टीका केली जात असतानाच उबाठा शिवसेनेलाही आता गुजराती मते मिळवण्यासाठी गुजराती भाषेतून पत्रके काढण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मराठी भाषेचे कैवारी म्हणवणाऱ्या उबाठा शिवसेनेने गुजराती भाषेतून प्रचाराची पत्रक काढत एकप्रकारे मराठी भाषिकांचाच अवमान केला आहे. त्यामुळे मराठी प्रेम हे केवळ राजकारणापुरतेच असल्याचे दिसून आले असून या माध्यमातून त्यांचा ढोंगीपणा उघड झाला आहे. (UBT Shiv Sena Vs Gujrati)

मुलुंडमध्ये मागील काही महिन्यांपूर्वी मराठी आणि गुजराती असा वाद पेटला असून त्यातच घाटकोपरमध्ये लावलेला ‘मारु घाटकोपर’ हा गुजरातीमधील बोर्ड उबाठा शिवसेनेने काढून टाकला होता. हे दोन्ही क्षेत्र उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघांमध्ये येत असून या लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून मिहिर कोटेचा आणि शिवसेना उबाठाच्यावतीने संजय पाटील हे निवडणूक रिंगणात आहे. (UBT Shiv Sena Vs Gujrati)

New Project 2024 05 08T202944.099

(हेही वाचा – पंतप्रधान मोदी आणि Raj Thackeray एकाच मंचावर येणार!)

‘मुंबई मा जिलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’

हे उमेदवार मराठी व अमराठी असल्याने याठिकाणी पुन्हा एकदा मराठीचा वाद पेटला आहे. त्यातच दोनच दिवसांपूर्वी उबाठा शिवसेनेचे उमेदवार संजय पाटील यांची मराठीतील प्रचाराची पत्रके वाटण्यास घाटकोपरमधील सोसायटीने विरोध केला असा कांगावा तयार करत मराठी माणसांना भडकवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, एकीकडे गुजराती समाजाविरोधात गरळ ओकणाऱ्या उबाठा शिवसेनेकडून दक्षिण मुंबईत गुजराती समाजाची मते मिळवण्यासाठी तसेच त्यांना कुरवाळण्यासाठी चक्क गुजराती भाषेतूनच प्रचाराची पत्रके तयार करून गुजराती वस्त्यांमध्ये वाटण्यात येत आहेत. अरविंद सावंत यांनी आपला फोटो आणि निवडणूक चिन्ह असलेली प्रचाराची पत्रके वाटली. (UBT Shiv Sena Vs Gujrati)

दक्षिण मुंबईतील मलबार हिल, पेडर रोड, गिरगाव, मुंबादेवी, वरळी आदी भागामध्ये गुजराती समाज मोठ्याप्रमाणात आहे. मागील विधानसभा निवडणुकीत वरळीतील उमेदवार असलेल्या आदित्य ठाकरे यांनी वरळीमध्ये मोठे होर्डिंग लावून त्यावर ‘केम शो मुंबईकर’ असे त्यावर लिहिले होते. त्यामुळे एकप्रकारे गुजराती समाजाला सादच घातली होती. त्यानंतर राज्यात ठाकरे सरकार असतानाच त्यांनी भाजपाकडे असलेल्या गुजराती व्होट बँकेला आपल्याकडे वळवण्यासाठी गुजराती कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला होता. ‘मुंबई मा जिलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशाप्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईत साधारणत: ३५ लाख गुजराती समुदाय असून त्यातील सुमारे १५ लाखांहून अधिक गुजराती मतदार आहेत. (UBT Shiv Sena Vs Gujrati)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.