UBT Shivsena Dasara Melava : उद्धव ठाकरे यांच्याकडून घराणेशाहीचे समर्थन; तर भाजपच्या बहुमतावर टोमणे

घराणेशाही नसलेल्यांच्या हाती सत्ता देण्यावर टोमणे मारताना उद्धव ठाकरे यांनी हिटलर, सद्दाम, मुसोलिनी, स्टॅलिन यांच्याशी तुलना केली. 'जे कुटुंबव्यवस्था मनात नाहीत, त्यांना घराणेशाहीविषयी बोलण्याचा अधिकार नाही. सध्याचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे वडील वाय वाय चंद्रचूड हेही सरन्यायाधीश होते', असे दाखलेही त्यांनी दिले.

188
UBT Shivsena Dasara Melava : उद्धव ठाकरे यांच्याकडून घराणेशाहीचे समर्थन; तर भाजपच्या बहुमतावर टोमणे
UBT Shivsena Dasara Melava : उद्धव ठाकरे यांच्याकडून घराणेशाहीचे समर्थन; तर भाजपच्या बहुमतावर टोमणे

होय, मी घराणेशाही मान्य करतो. मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. (UBT Shivsena Dasara Melava) घराण्याचे संस्कार असतात. आम्ही घराण्याची परंपरा जपणारे आहोत, अशा शब्दांत उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीचे समर्थन केले. ते २४ ऑक्टोबर या दिवशी शिवतीर्थ येथे झालेल्या दसरा मेळाव्याला संबोधित करत होते. गेली अनेक वर्षे उद्धव ठाकरे यांच्यावर घराणेशाहीचे आरोप होत आहेत. अनेक ज्येष्ठ नेते डावलून आदित्य ठाकरे यांना मंत्रीपद दिल्यानेही टीका होत आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीचे थेट समर्थन केले. या वेळी त्यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासह हिटलर पर्यंत अनेकांचे दाखले दिले. (UBT Shivsena Dasara Melava)

(हेही वाचा – UBT Shivsena Dasara Melava : राज्यात आणि दिल्लीत ठाकरेंचेच सरकार; शिवतीर्थावरून संजय राऊतांचा ‘इंडी’ आघाडीला सूचक इशारा)

‘जे कुटुंबव्यवस्था मनात नाहीत, त्यांना घराणेशाहीविषयी बोलण्याचा अधिकार नाही. सध्याचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे वडील वाय वाय चंद्रचूड हेही सरन्यायाधीश होते’, असे दाखलेही त्यांनी दिले. घराणेशाही नसलेल्यांच्या हाती सत्ता देण्यावर टोमणे मारताना उद्धव ठाकरे यांनी हिटलर, सद्दाम, मुसोलिनी, स्टॅलिन यांच्याशी तुलना केली. ठाकरे म्हणाले, ”हिटलर, सद्दाम, मुसोलिनी, स्टॅलिन यांच्या घराण्याचा पत्ता नाही. विकासाच्या नावावर हिटलरला ९८ टक्के बहुमत मिळाले होते. आता जर्मन लोकांना लाज वाटते की, आपण हिटलरला बहुमत दिले. त्यामुळे आता एका पक्षाला बहुमत असलेले पाशवी सरकार नको. खुर्ची डगमगत असते, तेव्हा देश स्थिर असतो. नरसिंहराव यांचे सरकार मजबूत होते.” असे म्हणून ठाकरे यांनी भाजपाला मिळणाऱ्या बहुमतावर टीका केली. (UBT Shivsena Dasara Melava)

दसरा मेळाव्यात यंदा काय नवीन ऐकायला मिळणार अशी उत्सुकता सर्वांना होती; परंतु उद्धव ठाकरे यांनी यंदाही मुंबईतील उद्योग-धंदे गुजरातला नेले, आरे मेट्रो शेड, कोविड काळात केलेले कार्य हे तेच तेच मुद्दे मांडले. (UBT Shivsena Dasara Melava)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.