Amit Thackeray यांना अडचणीत आणण्याचा उबाठाचा डाव; निवडणूक आयोगाला दिले पत्र

154
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे प्रथमच निवडणूक लढवत आहेत, त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर उबाठाकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या तरी माहीम मतदारसंघात तिरंगी लढत होणार असे चित्र आहे. त्यातच उबाठाने अमित ठाकरेंची कोंडी करण्याचा डाव टाकला आहे. उबाठाने अमित ठाकरेंच्या (Amit Thackeray) विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.

दीपोत्सवमुळे अडचण 

या पत्रात छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात अमित ठाकरेंनी (Amit Thackeray) आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप उबाठारे गटाने केला आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना उबाठाचे खासदार आणि सचिव अनिल देसाई यांनी तक्रारीचे पत्र लिहीले आहे. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात  आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पक्षाच्या बॅनरखाली दीपोत्सव साजरा करायला बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या नियमबाह्य परवानगी देण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. या कार्यक्रमस्थळी मनसेचे माहीम विधानसभेचे उमेदवार अमित राज ठाकरे (Amit Thackeray) हे उपस्थित राहिल्याने या कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा, अशी  मागणी ठाकरे गटाने केली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.