Uday Samant: मुख्यमंत्री शिंदे यांच्या सुट्टीवरून मंत्री उदय सामंत यांची स्पष्टोक्ती

एखादे मुख्यमंत्री अचानक रजेवर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. Uday Samant

231
Uday Samant
मुख्यमंत्री शिंदे यांच्या सुट्टीवरून मंत्री उदय सामंत यांची स्पष्टोक्ती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातून बंड करून भाजपसोबत हातमिळवणी केल्यापासून राज्यातील राजकारणाने नवे वळण घेतले आहे. त्यामुळे राजकारणात सध्या अनेक गोष्टी घडत आहेत. अशातच मुख्यमंत्री अचानक ३ ते ४ दिवस सुट्टी घेऊन सातारा येथे गेले आहेत. एखादे मुख्यमंत्री अचानक रजेवर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातून चर्चा सुरु झाल्या आहेत.

(हेही वाचा –Shivsena On Ajit Pawar: लवकरच अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार: शिवसेना नेत्याचा दावा)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज आहेत म्हणून गावी निघून गेले, असे विरोधक म्हणत आहेत. या सर्व प्रकारावर मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी भाष्य केलं आहे. ‘मुख्यमंत्री आपल्या गावी जत्रेसाठी गेले आहेत.’ असे त्यांनी सांगितले आहे.

नेमके काय म्हणाले मंत्री उदय सामंत?

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावची जत्रा आहे. ते गावच्या जत्रेला गेले आहेत. गावच्या जत्रेला गेल्यावरही मुख्यमंत्री नाराज आहे असं कुणी म्हणत असेल, तर त्यांचा नागरी सत्कार त्यांच्याच जत्रेत केला पाहिजे.” अशा शब्दांत उदय सामंत यांनी (Uday Samant) मुख्यमंत्री शिंदे यांच्या सुट्टीवर भाष्य केले.

हेही पहा – 

एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सततचे दौरे, उशिरापर्यंत चालणारे काम, भेटीगाठी, यामुळे शिंदे यांना काहीसा थकवा जाणवत आहे. त्यामुळे काही दिवस सर्व कामकाज बाजूला ठेवून विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.