प्रतिशिवसेना भवन उभारण्यात येणार असल्याचे म्हणत सहानुभूती मिळवण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरु असल्याचे, नवनिर्वाचित उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. राज्यात स्थापन झालेल्या भाजप-सेना सरकारमधील एकनाथ शिंदे गटातील शिवसेना समर्थक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. संभाजीराजेंची उमेदवारी नाकारणे ही गद्दारी होऊ शकत नाही का? असा सवाल उदय सामंत यांनी केला.
संभाजीराजेंची उमेदवारी नाकारणे ही गद्दारी नाही का?
संभाजीराजेंची उमेदवारी नाकारणे ही गद्दारी होऊ शकत नाही का? असा सवाल उदय सांमत यांनी केला. तर, प्रतिशिवसेना भवन उभारण्यात येणार असल्याचा दावा करत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न विरोधक करत असून, असा कोणताही संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला नसून, मध्यवर्ती कार्यालय असावे, अशी भूमिका असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. विधानभवनाबाहेर झालेल्या बाचाबाची दरम्यान घोषणा न देणा-या विरोधकांमधील काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.
( हेही वाचा: ट्विन टॉवरप्रमाणेच अनिल परब यांचे रिसॉर्ट जमीनदोस्त करण्याची सोमय्यांची मागणी )
तरीही आम्ही शिंदे साहेबांचे नेतृत्त्व स्वीकारले
आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीचे दरवाडे उघडे असल्याचे, आवाहन केले असले तरीही आम्ही शिंदे साहेबांचे नेतृत्त्व स्वीकारले असून, त्यांचा निर्णय बंधनकारक असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community