शिंदे गटातील आमदारांच्या गाड्या फोडण्याचे केले होते आवाहन; थोरात यांना पुणे पोलिसांकडून अटक

131

पुण्यात शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या कारवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. त्यानंतर आता शिंदे गटातील आमदारांच्या गाड्या फोडण्याची चिथावणी देणारे हिंगोलीतील शिवसेना पदाधिकारी बबन थोरात यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

बबन थोरात यांना चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी अटक

हिंगोली शिवसेना संपर्कप्रमुख बबन थोरात यांना मुंबईतून रात्रीच्या सुमारास पुणे पोलिसांनी अटक केली. उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगलेच संतप्त झाले. त्यांनी पुणे पोलिसांना हल्ले करणा-यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुंबईतील काळाचौकी पोलिसांनी बबन थोरात यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. तोपर्यंत पुणे पोलिसांचे पथक बबन थोरात यांचा ताबा घेण्यासाठी मुंबईत पोहोचले होते. बबन थोरात यांना अटक करुन पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

( हेही वाचा: उदय सामंत हल्लाप्रकरणी पुण्यातील शिवसेना शहर प्रमुख संजय मोरेंसह पाच जणांना अटक )

नेमकी घटना काय?

मंगळवारी उदय सामंत यांच्या वाहनावर कात्रज परिसरात हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात उदय सामंत यांच्या वाहनाची मागची काच फुटली. विशेष म्हणजे मंगळवारी आदित्य ठाकरे यांचीदेखील कात्रजमध्ये सभा होती. उदय सामंत हे दगडू शेठ मंदिरात जात असताना, काही जणांच्या जमावाने उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला केला. यावेळी गद्दार, गद्दार अशा घोषणा देण्यात आल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.