एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी हल्ला झाला. पुण्यातील कात्रज परिसरात हा हल्ला झाला होता. या हल्ल्यात उदय सामंत यांच्या गाडीची काच फुटली. आता या हल्लाप्रकरणात पुण्याचे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी संजय मोरे यांना मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. तसेच आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद सभेच्या आयोजकांसह पाच जणांना अटक केली आहे.
नेमक प्रकरण काय?
मंगळवारी उदय सामंत यांच्या वाहनावर कात्रज परिसरात हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात उदय सामंत यांच्या वाहनाची मागची काच फुटली. विशेष म्हणजे मंगळवारी आदित्य ठाकरे यांचीदेखील कात्रजमध्ये सभा होती. सध्या उदय सामंत हल्लाप्रकरणात पुणे पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांना अटक केली आहे. तसेच, या हल्ला प्रकरणात शिवसंवाद सभेचे मुख्य आयोजक संभाजी थोरवे, राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रुपेश पवार यांना अटक करण्यात आली आहे. तर, पंधरा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
( हेही वाचा: मोदींच्या ताफ्यात येणार इलेक्ट्रिक कार? ठरू शकतात जगातले पहिले पंतप्रधान )
Join Our WhatsApp Community