काल म्हणजेच रविवार ३ डिसेंबर रोजी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या चार पैकी तीन राज्यांमध्ये भाजपचे सरकार आले. याच पार्श्वभूमीवर (Uday Samant) उदय सामंत यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा कोणताही परिणाम निकालावर झाला नाही असे उदय सामंत यांनी म्हंटले आहे.
नेमकं काय म्हणाले उदय सामंत ?
“कायमस्वरूपी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि सरकारवर टीका करणे हेच काँग्रेस व त्यांच्या सहकारी पक्षांचे धोरण होते. त्यांचेच सरकार येईल असे वातावरण काँग्रेस व त्यांच्या सहकारी पक्षाने तयार केले होते. त्याला खऱ्या अर्थाने देशाच्या मतदारांनी शय दिला आहे आणि तिन्ही राज्यांमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये फार मोठ्या फरकाने भाजप विजयी झाला आहे. (Uday Samant)
(हेही वाचा – Mizoram Assembly Election 2023 : मिझोराम मध्ये मतमोजणीला सुरुवात)
नऊ वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये जी विकासात्मक घोडदौड केली, देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवले, ग्लोबल लीडर म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले, हा निकाल म्हणजे त्याचाच परिणाम आहे. एक पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी केलेले काम, मग त्यात हिंदुत्वाबद्दल घेतलेली भूमिका, राममंदिराचे आश्वासन पूर्ण करणे, सर्व जातीधर्माच्या लोकांना न्याय मिळवून देणे, तसेच महिला, युवावर्ग व अबालवृद्धांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी केले आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवणाऱ्या व भ्रमाचा भोपळा फोडणाऱ्या मतदारांचे आभार मानतो. याच पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा निवडणुका होतील आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान मध्ये झालेल्या विजयाप्रमाणे महाराष्ट्रात देखील लोकसभा निवडणुकीत ४५ पेक्षा जास्त खासदार आणि विधानसभेमध्ये २१५ पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, असे वक्तव्य महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी म्हंटले आहे.”
(हेही वाचा – Sheikh Maharaj Sher Singh : जिहादच्या विरोधात उभे राहणारे शीख महाराज शेर सिंह)
उदय सामंत (Uday Samant) पुढे म्हणाले की, “काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेचा कुठलाही परिणाम निवडणुकांच्या निकालावर झाला नाही. कारण कायमस्वरूपी नकारात्मकता, वंशवादीपणा व कायस्वरूपी घेतलेले हिंदूविरोधी धोरण हीच काँग्रेसची नेहमी भूमिका राहिलेली आहे आणि ही भूमिकाच त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनी आतातरी शहाणे होणे गरजेचे आहे आणि त्यांच्या जीवावर राजकारण करणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांनी सुद्धा शहाणे होणे गरजेचे आहे.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community