उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर काय म्हणाले उदय सामंत?

102

दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्क येथे होणार आहे, त्याची चर्चा आता जोरदार सुरु झाली आहे. त्यावर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी खिल्ली उडवली. यात शिवसेनेच्या मेळाव्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यामुळे हा मेळावा शिवसेनेचा नसून महाविकास आघाडीचा असेल, असे उदय सामंत म्हणाले.

मेळाव्याच्या आधीच चर्चा 

दसऱ्याच्या दिवशी दोन मेळाव्याची चर्चा आजपासून सुरु झाली आहे. यात शिंदे गटाचा मेळावा बीकेसी येथे होणार आहे. तर दुसरीकडे शिवाजी पार्क येथे शिवसेनेचा मेळावा होणार आहे. दोन्ही मेळाव्यात भाषणे कशी होणार आहे, यावर तर्कवितर्क लढवले जात आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची खिल्ली उडवली आहे. आमचा दसरा मेळावा हा शिंदे गटाचा मेळावा नाही. हा शिवसेनेचा दसरा मेळावा आहे. शिवसेनेच्या मेळाव्याला राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून मदत मिळणार आहे. त्यासाठी शिवसेना काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा देणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाचा मेळावा हा शिवसेनेचा नसून हा महाविकास आघाडीचा मेळावा आहे, असे उदय सामंत म्हणाले. उदय सामंत हे बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आले होते.

(हेही वाचा ‘काश्मीर फाईल्स’नंतर आता गांधी फाईल्स… गांधी हत्येमागील सत्य उलगडणार?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.