रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri Sindhudurg Loksabha) लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीतील (Uday Samant) भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेला अखेर तिढा सुटला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरी -सिंधुदुर्गमधुन महायुतीकडून नारायण राणे उमेदवार असणार आहे. त्यामुळे आता नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात थेट लढत असणार आहे. यावर उदय सामंत (Uday Samant) यांनी पत्रकार परिषद घेत सामंजास्याची भूमिका दाखवली आहे.
(हेही वाचा –Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha : सिंधुदुर्गातून नारायण राणे महायुतीचे उमेदवार, सामंत यांची माघार )
उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, “आम्ही काही काळ थांबण्याचा निर्णय घेतला असला तरी, उद्या (१९ एप्रिल) नारायण राणे यांचा लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरताना आम्ही पूर्ण ताकदीने नारायण राणेंबरोबर उभे राहू. आमचा मतदारसंघ आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्हा नारायण राणेंबरोबर, महायुतीबरोबर असेल. हे करत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द खाली पडणार नाही याची काळजी घेतली जाईल. आम्ही हा निर्णय घेतला म्हणजे आम्ही राजकारणातून बाहेर पडलो नाही, आमचं कुटुंब थांबलेलं नाही. आम्ही काही काळ थांबायचा निर्णय घेतला आहे. तसेच नारायण राणेंना समर्थन द्यायचं ठरवलं आहे.” (Uday Samant)
(हेही वाचा –Narayan Rane : संजय राऊत आणि उद्धव ठाकरे वेडे झालेत; नारायण राणेंची बोचरी टीका)
“सध्या माघार घेताना किंवा नारायण राणेंना समर्थन देताना आमच्यात काय चर्चा झाली आहे ही गोष्ट आम्ही माध्यमांसमोर जाहीर करू शकत नाही. किरण सामंत यांचा महायुतीत सन्मान होईल, असा शब्द अमित शाह, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला दिला आहे. प्रसारमाध्यमं आणि स्थानिक रहिवाशांच्या मनात संभ्रम होता की, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा उमेदवार कोण असेल? याबाबत आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही सध्या माघार घेतली असून नारायण राणे आमचे लोकसभेचे उमेदवार असतील. आम्ही पूर्ण ताकदीने नारायण राणेंचा प्रचार करू.” अशी भुमिका सामंत बंधुनी स्पष्ट केली. (Uday Samant)
हे पहा –
Join Our WhatsApp Community