Uday Samant : मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट! मविआचे अनेक नेते…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातून बंड करून भाजपसोबत हातमिळवणी केल्यापासून राज्यातील राजकारण रोज वेगवेगळं वळण घेत आहे. त्यामुळे राजकारणात सध्या अनेक गोष्टी घडत आहेत.

280
Uday Samant
Uday Samant : मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट! मविआचे अनेक नेते...

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातून बंड करून भाजपसोबत हातमिळवणी केल्यापासून राज्यातील राजकारण रोज वेगवेगळं वळण घेत आहे. त्यामुळे राजकारणात सध्या अनेक गोष्टी घडत आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक रजा घेऊन सातारचा दौरा केला. एखादे मुख्यमंत्री अचानक रजेवर जाण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यावर अनेक तर्क-वितर्क लावले गेले. याबाबत मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना विचारलं असता त्यांनी एक मोठं विधान केलं आहे.

(हेही वाचा-ठाण्यात नवे मुख्यमंत्री कार्यालय; एकनाथ शिंदेंच्या मनात नेमके काय?)

काय म्हणाले मंत्री उदय सामंत?

मुख्यमंत्री नाराज असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. याबाबत प्रश्न विचारला असता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री नाराज नाहीत असे सांगितले. पुढे बोलतांना त्यांनी ठाकरे गटातील उरलेले १३ आमदार देखील एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. त्यासोबत राष्ट्रवादीचे २० आमदार आणि काँग्रेसचे बडे नेते देखील शिंदेंच्या संपर्कात आहेत. असं सांगत उदय सामंत (Uday Samant) यांनी गौप्यस्फोट केला आहे.

हेही पहा- 
मुख्यमंत्री शिंदे खरच नाराज आहेत का? उदय सामंत म्हणाले…

एकीकडे राज्याच्या राजकारणात फेरबदलांचे संकेत मिळत असताना, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची रजा घेतली. २४ ते २६ एप्रिल या दिवसांत मुख्यमंत्री रजा घेऊन सातारा येथील दरे या मूळ गावी गेले होते. त्यांनी घेतलेल्या या सुट्टीमुळे विरोधकांकडून मुख्यमंत्री नाराज असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र त्याच्या या दाव्याचं उदय सामंत (Uday Samant) यांनी खंडन केलं. “एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी जत्रेसाठी गेले आहेत.”

राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना सहानभुतीचा लाभ मिळेल. तर लोकसभा निवडणुकीत भाजपला जमतेम २० जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.