मुंबईतील इमारतींचे फायर ऑडिट करणार असल्याची घोषणा (Uday Samant) उदय सामंत यांनी केली. प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या अनुषंगाने बोलताना सामंत यांनी ही घोषणा केली.
मुंबईतील उंच इमारतींमध्ये आगीचा धोका वाढतोय. परंतु, अनेक इमारतींमध्ये अग्निशमन सुरक्षाविषयक नियमांसंदर्भात सुविधाच नसल्याचे आढळून आले. हे लक्षात घेता मुंबईसह ‘एमएमआर’मधील सर्वच उंच इमारतींच्या ‘फायर’ सुरक्षेची तपासणी करण्यात येईल, अशी माहिती राज्य शासनातर्फे (Uday Samant) मंत्री उदय सामंत यांनी दिली.
(हेही वाचा – GST Amendment Bill : जीएसटी सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर)
महाराष्ट्र अग्नी प्रतिबंधक व जीवसंरक्षण उपाययोजना अधिनियमातंर्गत इमारतींचे मालक-भोगवटादार, गृहनिर्माण संस्थांना फायर ऑडिट करणे अनिवार्य आहे. तसा अहवालदेखील त्यांना बीएमसीला सादर करावा लागतो. मुंबई अग्निशमन दलातर्फे देखील इमारतींची तपासणी करण्यात येते. (Uday Samant)
ऑक्टोबर २०२३ मध्ये गोरेगाव येथील जय भवानी इमारतीला लागलेल्या आगीनंतर हा मुद्दा ऐरणीवर आला होता. यानंतर बीएमसीतर्फे मुंबईतील ३४३ एसआरए इमारतींची तपासणी करण्यात आली होती. २०१५ ते आतापर्यंत तपासणी झालेल्या इमारतींची संख्या ५ हजार ८९० इतकीच आहे. अनेक इमारतींकडून अग्निशमन यंत्रणेबाबतच्या नियमांचे पालनच करण्यात येत नाही. मुंबईत २.१५ लाख इमारती आहेत. यातील सर्व उंच इमारतीचे फायर ऑडिट होत आहे की नाही याचे सर्वेक्षण करण्यात येईल. तसेच एमएमआरमध्ये यासंदर्भात भरारी पथकदेखील गठीत करणार असल्याचे (Uday Samant) उदय सामंत यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community