केसरकरांच्या प्रवक्ते पदावरून चर्चा, उदय सामंत थेट म्हणाले, “…हेच आमचे मुख्य प्रवक्ते”

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील ४० आमदारांना घेत भाजपसह सत्ता स्थापनेचा दावा केला. असे असातानाच गेले दीड महिना उलटला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर हे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सडकून टीका करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून केसरकरांची प्रवक्ते पदावरून उचलबांगडी करण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चांना शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी पूर्णविराम दिला आहे. उदय सामंत यांनी यासंदर्भात ट्विट करत प्रवक्तेपदाची जबाबदारीवर स्पष्टीकरण दिले आहे.

(हेही वाचा – राणेंची केसरकरांना ऑफर! म्हणाले, “१ तारखे पासून आमच्याकडे…”)

दिपक केसरकर यांच्या वादग्रस्त विधानामुळे शिंदे गट अडचणीत येत असल्याने लवकरच किरण पावसकर यांच्याकडे प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात असल्याच्या चर्चा सुरू आहे. अशापरिस्थितीत उदय सामंतांचे ट्वीट चर्चेत आले आहे. यासंदर्भात खुलासा करत ते म्हणाले की, ‘मा. दीपक केसरकर हेच आमचे मुख्यप्रवक्ते आहेत.. ह्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.. अफवांवर विश्वास ठेवू नये असे ‘

राणे यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी केली. राणे पिता-पुत्रांचा आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्यात मोठा वाटा होता, असा दावा केसरकर यांनी केला आहे. यासह भाजप नेते निलेश राणे आणि दिपक केसरकर यांच्या सिंधुदुर्गमध्ये तुतुमैमै सुरू आहे. केसरकर यांनी टीका केल्यावर नितेश राणे हे देखील टीका करत त्यांना प्रत्युत्तर देत आहे. त्यामुळे हा वाद राज्यातील बड्या नेत्यांपर्यंत पोहोचल्याने शिंदे गटाकडून दिपक केसरकर यांचे प्रवक्ते पद धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली, मात्र अशा अफवांवर कोणताही विश्वास न ठेवण्याचे आवाहन सामंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here