शिवरायांचा अवमान, उदय सामंतांनी केलेले ट्विट आले चर्चेत…

108

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानांचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांसह शिंदे गटातील आमदारांनीही याविरोधात तीव्र प्रतिक्रिया देत निषेध नोंदवला आहे. याच दरम्यान आता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक जुना फोटो ट्वीट केला आहे. हे ट्वीट चांगलेच चर्चेत आले आहे. आपल्या देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा हा अपमान नाही का?, असा सवाल देखील विचारला आहे.

उदय सामंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद माजी आमदार प्रकाश गजभिये हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशात तत्कालीन विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना मुजरा करताना… आपल्या देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा हा अपमान नाही का???, असे मंत्री सामंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

(हेही वाचा ‘भारत जोडो यात्रे’त आता ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा?)

काय म्हणाले होते राज्यपाल?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आमच्या शालेय जीवनात तुमचा आवडता हिरो कोण? आदर्श कोण? असे विचारले तर कोणी सुभाष चंद्र बोस, कोणी नेहरू असे सांगत. पण आता जर विचारले तुमचा हिरो कोण? आदर्श कोण? तर कोठे बाहेर जाण्याची गरज नाही. येथे महाराष्ट्रातच तुम्हाला हिरो मिळतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे झाले, डॉ. आंबडेकर ते गडकरी हे आजच्या युगाचे आदर्श आहेत,असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर आता उदय सामंत यांनी जुना फोटो शेअर करत ट्विट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.