Uday Samant यांचा मविआवर हल्लाबोल; म्हणाले, ‘लोकांची माथी भडकवण्याचा मविआचा डाव’

100
महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले आहे, परंतु विरोधी पक्ष सतत सत्ताधारी पक्षावर निवडणुकीत ईव्हीएमचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत आहेत. दरम्यान, शिवसेनेचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी विरोधकांच्या आरोपांवर जोरदार पलटवार केला आहे. ते म्हणाले, ईव्हीएमविरोधी (EVM) वातावरण निर्माण करण्याऐवजी आपले अपयश झाकण्याचा हा प्रयत्न आहे. (Uday Samant)

उदय सामंत म्हणाले, “लोकांना भडकावण्याचा हा विरोधकांचा डाव आहे. ईव्हीएमविरोधी (EVM) वातावरण निर्माण करण्याऐवजी आपले अपयश झाकण्याचा हा प्रयत्न आहे. एकीकडे ईव्हीएमच्या नावाने बोंबाबोंब करण्याची दुटप्पी भूमिका महाविकास आघाडीच्या लक्षात आली आहे.

(हेही वाचा – “…मग तिथेही ईव्हीएम घोटाळा झाला का?” Eknath Shinde यांचा शरद पवारांना सवाल)

तिन्ही नेते मंत्रिमंडळ हाताळण्यास सक्षम आहेत – उदय सामंत

महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उदय सामंत म्हणाले, की सरकार स्थापन झाले असून तिन्ही नेते मंत्रिमंडळ सांभाळण्यास सक्षम आहेत. हिवाळी अधिवेशनापूर्वी विस्तार होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्रात निकाल जाहीर झाल्यापासून विरोधी महाविकास आघाडी ईव्हीएममध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत आहे. अनेक जागांवर मतदानापेक्षा जास्त मतमोजणी झाली, तर अनेक जागांवर मतदानापेक्षा कमी मतमोजणी झाल्याचा त्यांचा दावा आहे. अनेक उमेदवार फेरमतमोजणी (Assembly Election 2024 recount) करण्याची मागणीही करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) आणि अजित पवार यांच्यासह सत्ताधारी पक्षांच्या अनेक सदस्यांनी विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतली.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.