पुण्यात महाविकास आघाडीचे दोन बडे नेते शिवसेनेत (Shiv Sena) दाखल होणार आहेत. अशी माहिती पुण्यात राज्याचे मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant press conference) यांनी पत्रकार परिषद घेत दिली. सामंत यांच्या या दाव्यामुळे शिवसेनेच्या उबाठा (Shivsena UBT) गटासह काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस (श.प) गटात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेत आता कोण येणार? आणि कोणत्या पक्षाला खिंडार पडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून राजकीय वर्तुळात या नव्या भूकंपाचीच चर्चा सुरू आहे. (Uday Samant)
उदय सामंत गुरुवार, २० फेब्रुवारी रोजी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, पुण्यातील काही नेते दोन दिवसांत आमच्या पक्षात येणार आहेत. यात कुणाचा समावेश आहे, हे मी तुम्हाला योग्य वेळी सांगेन. आम्ही या मोहिमेला ऑपरेशन टायगर (Operation Tiger) वैगरे नाव ठेवले नाही. हे नाव तुम्ही पत्रकारांनी ठेवले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून ठाकरे गटातील अनेक नेते व पदाधिकारी शिवसेना पक्षात येत आहेत. हे सर्वकाही कोणत्याही ऑपरेशनशिवाय होत आहे. असे मत उदय सामंत यांनी केले.
(हेही पाहा – विधीमंडळ समित्यांकडे राजकीय पक्षांचा पाठिंबा नाही; विधानसभा अध्यक्ष Rahul Narvekar यांची नाराजी)
उद्धव ठाकरेंवर घणाघात
शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येत असताना शरद पवार व अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध केल्याचा दावा केला आहे. उदय सामंत यांनी राऊतांच्या या दाव्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. माझ्या माहितीनुसार शरद पवार दुसऱ्यांच्या पक्षात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाहीत. पण काही लोकांनी (उद्धव ठाकरे) स्वतःला मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून एकनाथ शिंदे यांना त्यांना शरद पवारांचा विरोध असल्याचे सांगितले. पण त्यानंतरही शिंदे यांनी ते मोठ्या मनाने स्वीकारले, असे ते म्हणाले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community