भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीत उदयनराजे भोसले यांनी मराठा आणि धनगर आरक्षणप्रश्नी (Maratha Reservation) लवकर तोडगा काढण्याची विनंती केली आहे.
राज्यातला मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. एकीकडे, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात केली आहे.
(हेही वाचा – Ind vs SA 2nd ODI : गेबेखामधील दुसरा सामना ८ गडी राखून जिंकत दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ अशी बरोबरी )
यादरम्यान भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन मराठा आरक्षणावर लवकर तोडगा काढावा, अशी विनंती केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र आणि त्यांचे कार्य जगासमोर यावे. यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी नवी दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक उभे करावे तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, अशीही मागणी उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
हेही पहा –