उदयनराजे भोसले मोठी भूमिका घेणार, रायगडाकडे करणार कूच

140

राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान होत आहे, त्यामुळे व्यथित झालेले शिवाजी महाराज हे रायगडावर जाऊन आक्रोश व्यक्त करणार आहेत, त्यासाठी ते रायगडावर निघाले आहेत, तिथे ते स्वतःची राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या उदयनराजे भोसले हे भाजपच्या कोट्यातील राज्यसभेतील खासदारकी त्यांना देण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांविषयी केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याने राज्यात वाद उठला आहे. यामध्ये सर्वाधिक आक्रमक छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज भाजप खासदार उदयनराजे यांनी घेतली. दरम्यान यावर शिवरायांची बदनामी थांबवावी अन्यथा मला वेगळा विचार करावा लागेल अशा थेट इशारा उदयनराजे यांनी दिला होता. यावर उदयनराजे शनिवारी, ३ डिसेंबर जोरी रायगडावर आपली राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

(हेही वाचा सिद्धिविनायक मंदिरात भ्रष्टाचार; मनसेचा उद्धव गटावर गंभीर आरोप)

काय म्हणाले उदयनराजे?

खासदार उदयनराजे भोसले हे साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, छत्रपतींची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. त्यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आपण व्यथित आहोत. त्यामुळेच आपण रायगडावर जात आहोत, रायगडावर आपल्याला शिवप्रेमी मिळतील. तिथे मेळाव्याला संबोधित करणार आहे. आपल्याला कोणीही फोन केलेला नाही आणि आपले कोणाशीही बोलणे झालेले नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चेचे वृत्त फेटाळले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.