राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमानास्पद विधाने, बेताल वक्तव्ये करण्याचे जणू सत्रच सुरु आहे. प्रशांत कोरटकरने शिवरायांबाबत बेताल वक्तव्ये केली होती. याबाबतच आता खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी आक्रमक भूमिका घेतली असून अमित शहा (Amit Shah) यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. (Udayanraje Bhosle)
उदयनराजे भोसलेंची पोस्ट काय ?
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्म समभावाचा विचार देत स्वराज्याची स्थापना केली. राज्यकारभारात रयतेच्या सहभागाव्दारे लोकशाहीचा पाया रचला. परंतु काही विकृत मनोवृत्तीचे लोक गलिच्छपध्दतीने त्यांचा तसेच छत्रपती संभाजीमहाराज आणि राजमाता जिजाऊ मॉसाहेब यांचा अवमान होईल असे भाष्य, टिपणी किंवा कृती करतात. यामुळे कायदा व सुव्यवस्था ढासळुन, समाजामध्ये दुफळी पसरते. (Udayanraje Bhosle)
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्म समभावाचा विचार देत स्वराज्याची स्थापना केली. राज्यकारभारात रयतेच्या सहभागाव्दारे लोकशाहीचा पाया रचला. लोककल्याणासाठी अहोरात्र आयुष्य वेचले. परंतु काही विकृत मनोवृत्तीचे लोक गलिच्छपध्दतीने त्यांचा तसेच छत्रपती संभाजीमहाराज आणि राजमाता जिजाऊ… pic.twitter.com/2WRDCncGgR
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) March 27, 2025
अश्या प्रवृत्तींची जीभ छाटण्याची किंवा चौरंग करण्याची धमक आमच्यासह शिवप्रेमींमध्ये निश्चित आहे परंतु आम्ही संयम राखुन आहोत. केंद्र व राज्यशासनाने अश्या प्रवृत्तींना धडकी भरवणारा मकोका/ टाडा सारखा अजामिनपात्र आणि 10 वर्षे सश्रम कारावासाची व जबर दंडाची शिक्षा असलेला विशेष कायदा पारित करावा अन्यथा छत्रपती शिवाजी महाराज यांचे नांव घेण्याचा आपल्याला कोणालाच अधिकार राहणार नाही. (Udayanraje Bhosle)
हेही वाचा-CM Devendra Fadnavis यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यामुळे कार्यालये टाकताहेत कात!
देशाचे गृहमंत्री ना. अमित शहा यांची आज दिल्ली येथे भेट घेवून, विविध विषयांवर विस्तृत चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेत तसेच दिलेल्या निवेदनात नमुद केले की, राज्यशासनाने तज्ज्ञांशी विचारविमर्श करुन, ऐतिहासिक दस्तावेजांचा योग्य अर्थ लावून, यापूर्वीच शिवछत्रपतींसह मराठा साम्राज्याचा शासनमान्य साधार इतिहास प्रसिध्द करणे गरजेचे होते. आज विकृत प्रवृत्ती असलेली व्यक्ती, त्याला जसे समजले, वाटते आहे अश्या पध्दतीने इतिहासातील प्रसंगाचे वर्णन करुन अकारण विवाद निर्माण करतो. (Udayanraje Bhosle)
हेही वाचा- Delhi Government पहिल्यांदाच हिंदू नववर्ष साजरे करत देणार ‘फलाहार पार्टी’
ऐतिहासिक घटनांचे चित्रपट, दूरदर्शन मालिका, वेबसिरिज, डॉक्युमेंटरीज यांचे चित्रिकरणापूर्वी सेन्सॉर बोर्डाला सहाय्यभुत असलेली, इतिहासकार, संशोधक आणि इतिहासतज्ज्ञांचा समावेश असलेली कमिटी स्थापन करावी, कमिटीच्या शिफारशी विचारात घेवून सेन्सॉरशिप देण्यात यावी जेणेकरुन सभाव्य विरोधाभास टाळण्याचे आणि समाजस्वास्थ अबाधित राखणे शक्य होईल अशी सूचना देखिल यावेळी केली. (Udayanraje Bhosle)
हेही वाचा- BMC : मुंबईतील संभाव्य प्रदुषणाची माहिती मिळवण्यासाठी ‘दिल्ली’ पॅटर्न
सपूर्ण जगासाठी प्रेरणास्त्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याची प्रचिती देणारे राष्ट्रीय स्मारक नवी दिल्ली येथे उभारणे गरजेचे आहे. तसेच छत्रपती शिवाजीमहाराज यांचे वडील, स्वराज्याचे संकल्पक, शहाजीराजे भोसले यांची समाधी कर्नाटक राज्यात आहे. शहाजीराजेंची समाधी दुर्लक्षित आणि अविकसित राहाणे हे न पटणारे आहे. यावेळी समवेत, श्री. काका धुमाळ, ॲड . विनित पाटील, श्री. कुलदिप क्षिरसागर, करण यादव, उपस्थित होते. (Udayanraje Bhosle)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community