सध्या देशभरात अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाविषयी हिंदूंमध्ये उत्सुकता वाढलेली आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना भाजपविरोधी राजकीय पक्ष मात्र त्यावर टीकाटिपण्णी करत आहेत. त्यात तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन (Udaynidhi Stalin) यांचीही भर पडली आहे. उदयनिधी स्टॅलिन पुन्हा हिंदू धर्माच्या विरोधात बरळले आहेत. यावेळी स्टॅलिन यांनी अयोध्येत उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिरावर अवमानकारक टिपण्णी केली आहे. त्यामुळे स्टॅलिन यांच्या विरोधात पुन्हा संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.
(हेही वाचा Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांची चारही शंकराचार्यांना विशेष विनंती; म्हणाले…)
काय म्हणाले स्टॅलिन?
प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनिधी स्टॅलिन (Udaynidhi Stalin) यांना राम मंदिराबाबत विचारण्यात आले. यावर उदयनिधी म्हणाले, ‘डीएमकेचा (DMK) कोणत्याही धर्माला विरोध नाही, असे करुणानिधी नेहमीच सांगत होते. मंदिर (Temple) बांधण्यात काहीच अडचण नाही, पण मशीद (Masjid) पाडून मंदिर बांधणे आम्हाला मान्य नाही. अध्यात्मवाद आणि राजकारण यांना एकत्र करू नका.
याआधीही स्टॅलिन (Udaynidhi Stalin) यांनी हिंदू धर्माच्या विरोधात गरळ ओकली आहे. उदयनिधी यांनी यापूर्वी सनातन धर्माची तुलना कोरोना आणि डेंग्यू यांसारख्या आजारांशी केली होती. यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.
Join Our WhatsApp Community