काल म्हणजेच १८ जुलै रोजी सर्व विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav – Ajit Meeting) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. अजित पवार यांच्या बंडामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी अजित पवार यांची भेट घेतली.
उद्धव ठाकरे हे थेट अजित पवारांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधून या त्यांच्या भेटीचा खुलासा केला.
(हेही वाचा – आमदारांच्या अधिकारांवर न्यायालयाला अतिक्रमण करू देणार नाही; विधानसभा अध्यक्षांची ग्वाही)
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे म्हणाले की, अजित पवार यांनी राज्यासाठी चांगले काम करावे, राज्याचे तसेच मुळ शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका,
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अजित पवारांनी अडीच वर्ष माझ्यासोबत काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्या स्वभावाची मला कल्पना आहे. इथे बाकीच्यांचे सत्तेसाठी काहीही डावपेच चालले असले तरी अजित पवार यांच्याकडून जनतेला योग्य मदत मिळेल. कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या परत एकदा त्यांच्याकडे दिल्या गेल्या आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
विरोधी पक्षांच्या बैठकीवर भाष्य करतांना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, तसेच काल आणि परवा बंगळुरु येथे देशप्रेमी पक्षांची बैठक पार पडली. लढाई व्यक्ती किंवा पक्षाविरोधात नसून हुकूमशाही विरोधात आहे. पण जो पायंडा पडतो आहे ते देशासाठी घातक आहे, त्यासाठी सर्व लोकशाहीप्रेमी पक्ष एकत्र येत आघाडी मजबूत निर्माण झाली आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community