बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना आता पूर्णतः एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नावापुढचे ‘शिवसेना’ हे पक्षनामही जाण्याची चिन्हे आहेत.
( हेही वाचा : देशातील ‘या’ भागाचे तापमान ४० अंशावर! पुढचे दोन दिवस उष्णता आणखी वाढणार, काय काळजी घ्याल?)
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे ठाकरे गटाला आपल्या पक्षाच्या नावापुढे आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लावता येणार नाही. याआधी काँग्रेस किंवा अन्य पक्षात पडलेल्या फुटीनंतर त्यांनाही तशी नावे वापरण्यास मनाई करण्यात आली होती.
काँग्रेस पक्षात फूट पडल्यावर संघटनात्मक काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, वायएसआर काँग्रेस अशा विविध पक्षांच्या नावांमध्ये काँग्रेसचा उल्लेख करण्यात येतो. त्याच धर्तीवर उद्धव ठाकरे गटाला ‘उद्धव शिवसेना’ किंवा अशा पद्धतीने आधी कोणते तरी नाव वापरून अखेरीस ‘शिवसेना’ नाव वापरता येऊ शकेल.
असाही पेच…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुका पार पडेपर्यंतच वापरता येईल. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. दुसरीकडे, शिंदे गटाकडे असलेले ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव गोठविण्यात आले आहे. यामुळे ठाकरे गटाला हे नाव वापरता येणार नाही.
Join Our WhatsApp Community