- प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या पक्षाने आम आदमी पक्षाला (आप) पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे, ज्यामुळे काँग्रेससोबतच्या इंडी आघाडीत फाटाफूट होण्याचे संकेत मिळत आहेत.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या या निर्णयामुळे काँग्रेससाठी दिल्लीतील राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत. तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, आणि राष्ट्रीय जनता दल या पक्षांनीही अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप पक्षाला ठामपणे पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, इंडी आघाडीत काँग्रेसला सध्या कोणत्याही मोठ्या पक्षाची साथ लाभलेली नाही.
(हेही वाचा – Fake Income Tax Officer: आयकर अधिकाऱ्याच्या नावे 40 जणांना लुटले, 2 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद)
उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) घेतलेला हा निर्णय अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात आहे. शिवसेना (उबाठा) हा काँग्रेससोबत महाविकास आघाडीचा भाग असला, तरी दिल्लीसारख्या महत्त्वाच्या निवडणुकीत काँग्रेसऐवजी आपच्या बाजूने उभे राहणे, हे आघाडीतील तणावाचे द्योतक आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, दिल्ली निवडणुकीत काँग्रेसला कमी करण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेली ही खेळी, त्यांच्या पुढील राजकीय धोरणांवरही प्रकाश टाकते. काँग्रेसने या निर्णयाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला दिलेला हा झटका, आगामी निवडणुकांसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो. त्यामुळे इंडी आघाडीत काँग्रेसचे स्थान कमकुवत होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community