शिंदे गटासोबत गेलेल्या आमदारांमुळे ठाकरे सरकार कोसळलं आणि राज्यात शिंदे सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदेंनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून शिवसेना पक्ष आणि त्याचे धनुष्यबाण चिन्ह हे आपल्याला मिळावे अशी विनंती होती. तर उद्धव ठाकरेंनी सुद्धा यासंदर्भात आमचे म्हणणे ऐकून घ्यावे अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केली होती. यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोग सक्रिय झाला असून ८ ऑगस्टपर्यंत दोन्ही गटाला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी आणि खरी शिवसेना कोणाची हे सिद्द करण्यासाठी मुदत दिली आहे.
८ ऑगस्टपर्यंत कागदपत्रासह म्हणणे मांडण्याची मुदत
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला ८ ऑगस्ट दुपारी १ वाजेपर्यंत संबंधित कागदपत्रासह आपणे म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे. त्यानंतर निवडणूक आयोग यावर सुनावणी करेल. केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे-शिंदे यांच्या पत्राची दखल घेत दोन्ही गटाला ८ ऑगस्ट २०२२ पर्यंत त्यांचा दावा सिद्ध करणारी कागदपत्रे घेऊन म्हणणं मांडण्याची मुदत दिली आहे.
( हेही वाचा : उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना मारण्याची सुपारी दिली होती; नितेश राणेंचा गंभीर आरोप)
तर, शिवसेना-शिंदे गटाच्या कायदेशीर लढाईची सुनावणी १ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात केली जाणार आहे. तत्पूर्वी दोन्ही बाजुंनी 27 जुलै पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावे आणि कागदपत्रे व सभागृहाचे सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
Join Our WhatsApp Community