शिवसेनेविरोधात बंड करून ५० आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदेंनी बंड केले. यानंतर भाजपसह सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांच्या ट्विटनंतर या चर्चांना अधिक उधाण आल्याचे पाहायला मिळाले. यावरच शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत स्पष्टीकरण दिले आहे.
(हेही वाचा – भारतात येणाऱ्या Indigo विमानाचं कराचीत इमर्जन्सी लँडिग! काय आहे कारण?)
काय म्हणाले राऊत…
दिपाली सय्यद यांच्या ट्विटसंदर्भात राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, दिपाली सय्यद अभिनेत्री आहेत. पक्षाचे काम करतात. त्यांना हे अधिकार कोणी दिले, याची मला माहिती नाही. ते काही प्रवक्ते नाही. अशा प्रकारची वक्तव्य करताना काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे. ते दोघं एकत्र येतील किंवा नाही ते येणारा काळ ठरवेल. ते आमचेच सहकारी आहेत मित्र आहेत. इतकी वर्ष आम्ही एकत्र काम केले तर त्यांनी एकत्र यावं असं का वाटणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.
पुढे राऊत मंत्रिमंडळावरून म्हणाले की, आमचे मंत्री सात होते दोघे नव्हते. गेल्या १५ दिवसांपासून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट दोघांमध्येच होत आहे. भाजपमध्ये घटना तज्ज्ञ, कायदे तज्ज्ञ यांची मोठी फौज असून नैतिकता दिसत नाही. जे ४० लोकं सोबत नेले त्यांच्यावर भाजपने खूप आरोप केले आहेत, अशांसोबत मांडीला मांडी लावून कसं बसायचं याबद्दल भाजपाला चिंता आहे. हे सगळे मंत्री पदासाठी गेले आहेत. अनेक लोक मुंबईत येऊन शक्ती प्रदर्शन करत आहेत. मंत्री करा असे प्रकार शिवसेने कधी झाले नसल्याचे सांगत राऊतांनी शिंदे गटावर निशाणा देखील साधला.
काय आहे दिपाली सय्यद यांचं ट्विट
येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरं वाटलं. शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखांची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहेत. या मध्यस्तीकरता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद, चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल.
https://twitter.com/deepalisayed/status/1548358677635076116?s=20&t=zsAXZ5-AiijTyuDzkDmzFQ
Join Our WhatsApp Community