कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि केशव हेडगेवार यांचा धडा इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून वगळण्याचा निर्णय घेतला होता. याच पार्श्वभूमीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्नाटक सरकारच्या या निर्णयावर उद्धव ठाकरेंचे नेमके मत काय? असा सवाल केला होता. त्याच सवालचे उत्तर रविवारी, १८ जूनला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. कर्नाटकमध्ये अभ्यासक्रमातून वीर सावरकरांचा धडा वगळला याचा निषेध करतोच, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
रविवारी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे वरळीत शिबीर संपन्न झाले. त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, ‘कर्नाटक सरकारने वीर सावरकरांचा धडा अभ्यासक्रमातून वगळला, यावर उद्धव ठाकरेंचे मत काय असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला होता. पहिलं म्हणजे देवेंद्र फडणवीस तुमची परिस्थिती हलाकीची आहे. तुम्ही बोलताय ठिक आहे. पूर्वी जाहिरात यायची, सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस. धड सहनही होत नाही, जे काही सगळे अपमान होताहेत ते आणि सांगताही येत नाही. करू काय? वरून आदेश आहे. देवेंद्रजी वीर सावरकरांचा धडा वगळला याचा निषेध करतोच. पण ज्या वीर सावरकरांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कष्ट भोगले, म्हणून त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणतात. ते कष्ट करून मरण यातना भोगून वीर सावरकरांनी जो देश स्वतंत्र केला, तो देश ज्याचा स्वातंत्र्य संग्रामात काडीचाही संबंध नव्हता, अशी एक विचारधारा जोखडा खाली आणू इच्छिते त्याच्याबद्दल तुमचं मत काय?, असा सवाल ठाकरेंनी फडणवीसांना केला.
(हेही वाचा – आशिष देशमुखांची घरवापसी; फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत देशमुखांचा भाजपमध्ये प्रवेश)
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, काय आहेत, वीर सावरकरांची मते? वीर सावरकरांनी जे कष्ट आणि हालअपेष्टा भोगल्या होत्या त्या मोदी आणि फडणवीसांसाठी भोगल्या होत्या? एवढे जे क्रांतीकारक फासावर गेले, त्यांनी छातीवरती गोळ्या झेलल्या, तुरुंगावास झेलला, ते तुमचे भक्त म्हणून देशामध्ये गांडूळाची अवलात पैदा करण्यासाठी? जर तुम्ही खरे वीर सावरकरप्रेमी असाल, तर देश आपल्या बुडाखाली घेणाऱ्या आपल्या नेत्याचा धिक्कार करा. हिंमत असेल तर करून दाखवा. म्हणून जे म्हणतोय, आम्ही भाजपत्तर जे पक्ष एकत्र येतोय, ते देशाचे स्वातंत्र्य, देशाची लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी येतोय. जसं संजय राऊतांनी सांगितलं, आमचा एकच बाप आहे. तुमचे किती तुम्हाला माहित. कारण मध्ये जाहिरात आली होती, त्यात बापच बदलेला होता. मग दुसऱ्यादिवशी आणखी सगळ्यांचे फोटो लागले, असे उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community