माझ्यावर होणा-या टीकेला शांतपणे घेतोय, पण…! मुख्यमंत्र्यांचा गर्भित इशारा

201

मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांची आभासी बैठक घेतली. या बैठकीत मुंबईतील 227 शाखाप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक, आमदार आणि खासदार यांचा समावेश होता. माझ्यावर होणा-या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला जे दाखवायच ते मी त्याचवेळी करुन दाखवतो. तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा, असे बैठकीदरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

कामे जनतेपर्यंत पोहोचवा

विभागातील कामे जनतेपर्यंत पोहोचवा, तसेच मुंबई महापालिकेने नगरविकास विभागाच्या सहकार्याने घेतलेला पाचशे स्क्वेअर फुटाचा मालमत्ता कराचा निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले. आपल्या विकासकामांची पोचपावती मिळायला हवी, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. माझ्यावर वैयक्तिक टीका होत आहे, त्या टीकांना मी शांतपणे घेतोय वेळ आल्यावरच ज्यांना करुन दाखवायचयं त्यांना मी करुन दाखवेन, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

( हेही वाचा :आता ओमायक्राॅन ओळखणे झाले सोपे…)

बॅनर लावू नका 

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी होर्डिंग, बॅनर लावण्यापेक्षा जनतेपर्यंत पोहोचणं गरजेच आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मोठ-मोठे बॅनर लावू नका ते जनतेला आवडत नाही, असे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साडेदहा वाजता सुरू झालेली बैठक साडेअकराला संपली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.