‘आयुष्यातील पहिली निवडणूक समजून लढा’, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर पहिल्यांदाच गोरेगाव येथील नेस्को मैदानात मुंबईतील गट प्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित करताना शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. त्यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आवाहन देखील केले आहे. आगामी महापालिका निवडणूक ही पहिली निवडणूक आहे असं समजून लढा, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंचे आवाहन

सध्या मुंबई गिळण्यासाठी गिधाडं फिरत आहेत. पण या गिधाडांना मुंबई आपण गिळू द्यायची नाही. माझा प्रत्येक शिवसैनिक हा ठाकरे कुटुंबाचा सदस्य आहे. शिवसेना काही रस्त्यावरचं झुरळ किंवा ढेकूण नाही कुणीही येईल आणि चिरडून जाईल. देवेंद्र फडणवीस म्हणाले की त्यांच्या आयुष्यातील ही शेवटची निवडणूक असल्याप्रमाणे लढणार आहोत. त्यांच्यासाठी ही शेवटचीच निवडणूक आहे पण आपल्यासाठी ही पहिली निवडणूक आहे असं समजून ही निवडणूक लढायची आहे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

(हेही वाचाः ‘आम्हाला जमीन दाखवाल तर तुम्हाला असमान दाखवू’, उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात)

कामाला लागा

असं समजा आज आपल्याकडे काही नाही, मुंबई महापालिका बरखास्त झाली आहे.जे आमदार, खासदार गेले आहेत ते गेल्या निवडणुकीतच पडले आहेत असं समजून आपल्याला नव्याने झेंडा फडकवायचा आहे त्यासाठी कामाला लागा, असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः ‘सध्या बाप पळवणारी अवलाद महाराष्ट्रात फिरतेय’, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here