राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर पहिल्यांदाच शिवसेनेच्या गट प्रमुखांचा मेळावा हा गोरेगाव येथील नेस्को मैदानावर पार पडला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेळाव्याला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असल्याचे सांगताना त्यांनी शिंदे गटावर देखील टीका केली आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटाचा उल्लेख मिंधे गट असा करत बाप पळवणारी टोळी अशी अप्रत्यक्ष टीका शिंदे गटावर त्यांनी केली आहे.
या गट प्रमुख मेळाव्याला इतका प्रतिसाद मिळतोय तर मग दसरा मेळाव्यासाठी किती पटीने असेल हे लक्षात येतंय. दसरा मेळावा शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे शिवतीर्थावर होणार आत काही शंका नाही, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
(हेही वाचाः संजय राऊत जेलमध्ये पण ठाकरे गटाच्या मनामध्ये, उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात राऊतांसाठी राखीव खुर्ची)
मिंधे गट ते बाप पळवणारी अलवाद
संजय राऊत यांच्यासाठी या मेळाव्यात खुर्ची राखीव ठेवण्यात आली होती. त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी खुलासा केला. संजय राऊत हे मोडेन पण वाकणार नाही म्हणत एकट्याने तलवार घेऊन ईडीच्या कारवाई विरोधात आहेत. ते मिंधे गटात गेलेले नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंचावर माझे वडील आहेत की नाही हे पाहिले. कारण मुलं पळवणारी टोळी पाहिली आहे पण सध्या बाप पळवणारी अवलाद महाराष्ट्रामध्ये फिरतेय, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
Join Our WhatsApp Community