उध्दव ठाकरे यांना पुन्हा आठवले कार्यकर्ते, लग्नसोहळ्यातही लावली जाते उपस्थिती

137

शिवसेनेची दोन छकले पडल्यानंतर खरी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मान्यता दिल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्षाची मोट बांधण्यास सुरुवात केली. त्यामुळे आजवर घराच्या बाहेर न पडणारे उध्दव ठाकरे आता कार्यकर्त्यांच्या साध्या साध्या कार्यक्रमांनाही उपस्थित लावून लागले आहे. मागील आठवड्यात तर त्यांनी एका लग्न सोहळयालाच सपत्निक हजेरी लावली. त्यांच्या या हजेरीमुळे सर्वच कार्यकर्त्यांच्या भूवया उंचावल्या आहेत.

( हेही वाचा : शासकीय नोकरभरतीत तृतीय पंथीयासाठी मिळणार स्वतंत्र पर्याय – सरकारची उच्च न्यायालयात माहिती)

मागील आठवडयात शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मारुती साळुंखे यांचे सुपुत्र स्मितेश व भायखळा विधानसभेचा सहसंघटक हेमंत कदम यांची सुकन्या सायली यांच्या विवाहप्रसंगी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि रश्मी उध्दव ठाकरे यांनी उपस्थित राहत शुभाशीर्वाद दिले. आतापर्यंत अशाप्रकारे छोट्या पदाधिकाऱ्यांच्या मुलांच्या लग्नात मागील काही वर्षांमध्ये उपस्थित राहण्याची ही उध्दव ठाकरे यांची पहिलीच वेळ आली. शिवसेना पक्षप्रमुख बनल्यानंतर, उध्दव ठाकरे हे कोणत्याही शिवसैनिकांच्या कार्यक्रमात उपस्थित राहत नव्हते. मोठ्या नेत्यांच्या मुलांच्या लग्नात किंवा त्यांच्या कार्यक्रमांना उध्दव ठाकरे हे तुरळक हजेरी लावत होते.

त्यातच मागील तीन वर्षांपासून मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांचे पक्षाकडे दुर्लक्ष होत होते. कोविड काळापासून त्यांनी कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आजवर कार्यकर्त्यांच्या अगदी जवळ जाण्याचा किंवा कार्यकर्त्यांशी जवळून संवाद साधण्याचा प्रयत्नही न करणाऱ्या उध्दव ठाकरे यांना आता पक्ष फुटीनंतर कार्यकर्त्यांशी जवळकी साधून त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा प्रेमाचे आणि आपुलकीचे नाते निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पक्ष फुटीमुळे उध्दव ठाकरे यांना कार्यकर्त्यांची खरी किंमत कळाली असून पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना जोडण्याचा प्रयत्नात ते छोट्यात छोट्या कार्यकर्त्यांच्या तसेच पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमांत तसेच मुलांच्या लग्न सोहळयात हजेरी लावताना दिसत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.